राजुर प्रदर्शनात ईगतपुरीचा वळु ठरला चँम्पियन !


खबरबात प्रतिनिधी/विष्णू तळपाडे
दि.२५डिसें राजुर येथील संकरीत जनावरांच्या प्रदर्शनात ईगतपुरी तालुक्यातील धामणी गावच्या अकुंश भोसले यांच्या वळुने चँम्पियनचा मान पटकविला. डांगी व संकरीत जनावरांची पशुवैद्यकीय अधिकारी समितीने आ.वैभवराव पिचड ,तहसिलदार मुकेश काबंळे,पंचायत समिती सभापती सौ.रंजना मेंगाळ,गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,सरपंच हेमलता पिचड,आदीच्या उपस्थित निवड करण्यात आली.

राजुर प्रदर्शनात २५-३० हजारांच्या संख्येने जनावरे दाखल झाली असली तरी कोट्यावधी रुपयाची जनावरांची खरेदी-विकरी झाली असल्याची माहिती मिळते.हे प्रदर्शन राजुर ग्रामपंचायत व आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने भरविण्यात आले होते.ह्या प्रदर्शनात डांगी आदत२,४आणि६ दाती बैलजोडी,डांगी गायी आशा जातीवंत निवडक जनावरांची निवड करुन बक्षीस दिले जाते .

या प्रदर्शनात गायीच्या किमंती ५०हजारापर्यत गेली व बैलाच्या किंमती ह्या ८०-९०हजार पर्यत गेली .या ठिकाणी धामणी गावच्या रतन भोसले यांच्या वळुची उपचँम्पियन म्हणून निवड करण्यात आली.तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.