चंद्रपूरमधून लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..!

बुधवारी 2 जानेवारीला लोकसंवाद
मोबाईललॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

चंद्रपूरदि. 30 डिसेंबर : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईलसंगणकटॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील योजनांसदर्भात प्रातिनीधीक स्वरूपात काही लाभार्थी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधणार आहेत.
हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, Dev Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणिDevendra.Fadanavis या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण)उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाप्रधानमंत्री पीक विमा योजनामागेल त्याला शेततळेगाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार,स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनासूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. चंद्रपूर सह् अन्य जिल्हयातील लाभार्थी या संवादात सहभागी होत आहेत.