साताऱ्याच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा

मायणी/सतीश डोंगरे

           मायणी  (ता. खटाव जि.सातारा) शिवाजी महाराजांच्या राजधानीत निसर्गाच्या कुशीत असलेल्या निवांत रिर्साट सातारा येथे BMVM  विद्यालयातील १९९४ ची इयत्ता दहावीची एस एस सी बॅच असणारे विद्यार्थी विद्यर्थिनीनी एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित करून आपल्या माजी गुरुजनांचा वंदन करून आपल्या तुन दिवंगत झालेल्या मनोज घाडगे,व किरण लोखंडे यांना श्रद्धांजली वाहली.आयुष्यात पुढे जात असताना बऱ्याच वेळा पुढे पाहण्याऐवजी मागे वळुन पहायला खूप आवडतं आणि जुन्या आठवणीत रमायला ही तितकेच आवडते. भूतकाळात झालेल्या चुका बरेच काही शिकवतात पण काही चुका परत कराव्यात अशीच ईच्छा मनात पुन्हा पुन्हा येते. पण ते गेलेले क्षण काही परत येत नाही अशा वेळी बरोबर असतात त्या या आठवणी आपल्या शालेय जीवनास पुन्हा एकदा उजाळा दिला.
            प्रथम छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
        निवांत रिर्साट सातारा येथे  यावेळी १९९४ रोजीच्या बॅचचे गेल्या दोन महिन्यापूर्वीपासून  या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवण्यात आला होता.या सोशल मीडियाच्या आधुनिक तेचा वापर करून देशाच्या न्हवे तर परदेशात असणाऱ्या आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींना शोधून या कार्यक्रमाचे निमंत्रण सरीता काटकर,प्रविण तोरणे यांनी देण्यात आले होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत डॉ. विकास देशमुख, संतोष पुस्तके, डॉ. मोनिका चोथे,प्रास्ताविक सरीता काटकर यांनी केले.कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरात कामानिमित्त पसरलेले विद्यार्थी आहेत
              यावेळी  .माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी सर्वांच्या समोर कथन करतानाशाळेच्या परिसराची आठवण जरी काढली तरी बालपणीच्या आठवणी जशाच्या तश्या जाग्या होतात आणि चालते-बोलते चित्र तयार होते.  स्कॉलरशिप चे जादा तास, त्यावेळी खाल्लेल्या शेंगा, शिक्षकांचा खाल्लेला मार इतकेच नाही तर चिकाच्या झाडाची पाने दुमडून ओळखलेली वेळ, लपंडाव, धरूनढबु, विष-अमृत, लंगडीपळती असे अनेक खेळलेले निरनिराळे खेळ, दुपारच्या सुट्टीमध्ये खिशातून आणलेला खाऊ (विशेषतः वाळलेले सांडगे आणि कच्चे शेंगदाने) बोरवर पाण्यासाठी घातलेला गोंधळ,अशा कितीतरी शाळेच्या आठवणी मनात घर करून आहेत.

  भौतिक सुविधांनी आज शाळेचे रूप जरी बदलेले असले तरी आठवणी मात्र जशाच्या तशा जाग्या आहेत... .यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ.विकास देशमुख, सरीता काटकर यांनी तर उपस्थितांचे आभार संतोष पुस्तके यांनी मानले.