अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धेचे आयोजन

६ डिसें. ला वैचारिक अभिवादन
१९८ विद्यार्थी परीक्षेला बसले
चिमूर/:-रोहित रामटेके:


चिमूर:-डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या ग्रंथावर आधारित दोन गटामध्ये राज्यस्तरीय अभिवादन प्रशोंत्तरी स्पर्धा परीक्षा२०१८ चे आयोजन डाँ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोशिएशन आफ इंजिनिअर्स नागपूरच्या वतीने ६ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
   
        डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वैचारिक अभिवादन करण्याकरिता निम्मलिखित पुस्तकावर आधारित परीक्षेचे आयोजन केले आहे. महापुरुषांनी केलेल्या राष्टीय कार्याबद्धल विद्यार्थाना माहिती व्हावी ,त्यांना नियमित अध्यासाची सवय लागावी या करिता परीक्षेचे आयोजन केले आहे. जातीभेद निर्मूलन, मुक्ती कोण पते ? अस्पृश्य मूळचे कोण,क्रांती-प्रतिक्रांती,बुद्ध आणि कार्ल मार्क्स, राज्य आणि अल्पसंख्याक,हिंदू कोडबिल,भाषा व प्रांत रचना,बुद्ध आणि त्यांचा धम्म,या ग्रंथावर आधारित परीक्षा तसेच जनरल नालेज व ५०० शब्दाचा शोध निबंध यावर परीक्षा घेण्यात येत आहे.सर्व ग्रंथ विद्यार्थाना अर्ध्यापेक्षा कमी दरात देण्यात आली.
        अ गट ५ ते१२ वर्गाकरिता प्रथम क्रमांक परितोषित ५० हजार रुपये, द्वितीय परितोषित २५ हजार रुपये,व तृतीय १५ हजार रुपये आहे. ब गट  खुला प्रत्येक क्रमांकासाठी ६५ हजार रुपये द्वितीय क्रमांक ३५हजार रुपये व तृतीय क्रमांक१५हजार रुपये सन्मान चिन्ह देण्यात येणार परीक्षेचा वेळ ११ ते २ वाजेपर्यंत राहील.
      या परिक्षेकरिता चिमूर मधून १८९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.त्यामधून न्यू राष्टीय विद्या.५४ विद्यार्थी ,नेहरू महा.व कनिष्ठ महाविद्यालय ९१ विद्यार्थी तसेच सावित्रीबाई फुले महा.मासळ १६ विद्यार्थी आणि शाळाबाह्य विदयार्थी (शिक्षक वर्ग)२८असून एकूण१८९विदयार्थी बसले आहेत. या करिता न्यू राष्टीय विद्या.चिमूर चे मुख्याध्यापक किशोर खोब्रागडे सर, पठाण सर, सुनील खोब्रागडे,शंभरकर सर,रोकडे मॅडम, नेहरू महा.च्या प्राचार्या जोशोराव मॅडम, पी.डी. रामटेके,श्रीरामे सर,धारणे सर, व सावित्रीबाई फुले महा.चे सुखदेव रामटेके,अरुण गायकवाड यांनी सहकार्य केलेले आहे. तसेच बाणाई सचिव इंजि.जयंत इंगळे व इंजि.नितेश कांबळे मार्गदर्शन करीत आहेत.
    स्थानिक आयोजक शालीक स्थूल व विकास अंबादे सर यांनी सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.