४ जानेवारीपासून युथ एम्पावरमेंट समिट

युथ एम्पॉवरमेंट समिटची प्रतिनिधी सभा


नागपूर- स्टार्ट अप इंडिया, स्टेण्ड अप इंडियाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्याचा विश्वास युवकांमध्ये जागृत करण्याच्या दृष्टीने फॉर्च्यून फाऊंडेशनतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही युथ एम्पॉवरमेंट समीटचे आयोजन दि . ४ , ५ व ६ जानेवारीला देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजनासाठी प्रतिनिधी सभा पार पडली़

संस्थेचे अध्यक्ष व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील पाच वर्षापासून युथ एम्पॉवरमेंट समीटचे आयोजन यशस्वीपणे होत असून, फॉर्म्युन फाऊंडेशन ही संस्था विद्यार्थ्याकरिता कार्यरत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांतील कौशल्य विकसित करून त्यांना स्वत:करिता व इतरांकरिता रोजगार निर्माण करण्याचे कौशल्य निर्माण करता येईल व याविषयामध्ये तो मोठा उद्योजक बनू शकतो. फॉर्म्युन फाऊंडेशनच्या या समिटमध्ये अशा कौशल्यवान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण माहिती इथे उपलब्ध करून देते. इथे त्यांना रजिस्ट्रेशनच्या मार्फत विविध उद्योगातील तज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते. विविध कंपन्या, उद्योग, बँकेचे स्टॉल्स येथे लागतील़ यावर्षी युथ एम्पावरमेंट समीटचे लक्ष्य फक्त जॉब फोकसवर न राहता यावेळी इंटरव्यू घेणार आहेत. यावेळी एक लाख रजिस्ट्रेशन घेण्याचे लक्ष्य असून, मुलाखतीस ३ दिवस घेतले जाईल. त्याकरिता वेगवेगळया कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. १० ते १२ वी व विविध पदवीधर विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेनुसार इंटरव्यू घेतल्या जाईल. या तीन दिवसीय समिटचे उद्घाटन ४ तारखेला होईल. उदघाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. या तीन दिवसीय समिटमध्ये मेट्रो रेल प्रकल्पामधून निर्माण होणारे रोजगार, मेट्रो रेल्वेचे फायदे यावर मार्गदर्शन करण्यात येईल. दुसºया दिवशी मिहान प्रकल्पांमध्ये येणाºया विविध कंपन्या, त्यांचे उत्पादन, त्यातून मिळणारे रोजगार, आयात व निर्यात यांची माहिती तज्ञांद्वारे देण्यात येईल. सभेला प्रा. अनिल सोले व कुणाल पडोळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. सोबतच चंद्रकांत निन्हाले, अभिजीत बांगर यांचेसुद्धा महत्वपूर्ण मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. आजच्या या सभेमध्ये विदर्भातील उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपले प्रश्न , उद्योगाला लागणारी माहिती व आपल्या समस्य मांडल्या. यावेळी विविध शाळा व कॉलेजस मधील प्राचार्य उपस्थित होते . नि:शुल्क आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरिता शेवटची तारीख २० डिसेंबर आहे. कार्यक्रमाला प्रा. अनिल सोले, गिरीष देशमुख , संस्थेचे उपाध्यक्ष संदिप जाधव , सचिव जयंत पाठक , कुणाल पडोळे , प्रो , आशिष लारा , डॉ . सराद नैमुदिन , प्रो . अमृता बालल , प्रो . माधव देशपांडे , डॉ . असीम पाराते , डॉ . सचिन चौधरी , प्रा . संजय सिंग , प्रो . स्वप्नील पोतदार , प्रो . अमीर खान , प्रो . महेश चोपडे , प्रो . पराग शिरभाते , प्रो . स्वरूप गंडेवार इत्यादी उपस्थित होते.