स्पीड स्केटिंग स्पर्धा उदघाटन सोहळा

नागपूर/प्रतिनिधी 
स्पीड स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएसएफआय) सौजन्याने आणि हिलफोर्ट पब्लिक स्कुल च्या वतीने अंबाझरी स्थित ना.सु.प्र. च्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिकवर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धा उदघाटन सोहळा दि.26/12/2018 रोजी पार पडला.
या स्केटिंग स्पर्धेचे उदघाटन आमदार डॉ.परिणय फुके व पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका डॉ.परिणीता फुके, प्राचार्य प्रीती वैरागडे, माजी रणजीपट्टू हेमंत वसू, कृष्णा बैसवारे, एस.मृगनंदन, एम.गौतम, कुणाल बैसवारे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या आयोजनात भारतातील 11 राज्यांसह युएई, नेपाळ, आणि घाना येथील एकूण 550 स्केटर्स सहभागी झाले आहे.