चिमूर न्यायालयाने अवैध दारू विक्रेत्यास २५ हजार रुपये दंड

३ वर्ष सक्षम  करावासाची दिली शिक्षा



चिमूर/रोहित रामटेके
 दिनांक .१९/१२/२०१८ ला चिमूर न्यायालयाने आरोपी सुरेश गुलाब मेश्राम वय ४० वर्षे मौजा कपर्ला येथील रहिवासी असून यास २५ हजार रुपये दंड व ३ वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास ६ महिने सजा अशी शिक्षा ठोठावण्यात आली. असून १९/१२/२०१८ ला  हि सुनावनी चिमूर च्या न्यायालयात झाली. सुरेश गुलाब मेश्राम हे आपल्या मौजा कपर्ला येथे आपल्या राहत्या घरी अवैधरित्या दारूचा व्यवसाय करीत होते.याची गोपनीय माहिती भिसी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी आरोपीच्या घराची घरझडती घेतली असता त्यांच्या राहत्या घरी १५ नग देशी दारू असलेले १८० एम.एल. च्या काचेच्या शिशा आढळल्या होत्या. तत्कालीन पोलिस निरिक्षक API सी. मांडवकर व तपासी अधिकारी शरद मानकर यांनी आरोपीविरुद्ध कलम ७०३/२०१५ कलम ६५ ई म.दा.का अंतर्गत दि.१०/०४/२०१५ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. व आरोपीचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत चिमूर न्यायालयामध्ये या प्रकरनावर सुनावणी झाली असून दि.१९/१२/२०१८ ला जे.एम.एफ.सि.कोर्टाचे जज छल्लानी यांच्या माध्यमातून अभियोक्ता श्री.संजय आर. ठावरी व पैरावी अधिकारी सुधाकर एम बुटके यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करून त्यास ३ वर्ष सक्षम कारावास व २५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने सजा अशी शिक्षा देण्यात आली आहे.व नियमित पणे चंद्रपूर जिल्हा दारूबंदी असतांना सुद्धा दारू विक्री मोठ्या प्रमाणात अशिच सुरु राहणार काय अशी विचारधारा जनता व्यक्त करीत आहे.