शेतकरी विशेष;व्यक्तीवेध.....

व्यक्तीवेध.....


सध्याच्या काळात शेतमालातील प्रतवारी हि दिवसेंदिवस कमी होताना दिसते.आपल्या अन्नधान्याची जी चव होती ती कुठे तरी गमावली आहे.याचे कारण संकरित बियाणे हे होय.या बियाण्याचे काही फायदे आहेत.ते नाकारता येत नाहीत,पण आधीच्या बियाण्याची साठवणही त्यात महत्त्वाची आहे.

जैवविविधतेसाठी आदिवासी भागांत काही लोक असे बियाणे जतन करुन ठेवतात.राहिबाई पोपेरे यांचे या क्षेत्रातील काम अजोड म्हणावे लागेल त्यांचा BBCने जगातील १००व्यक्तीनमध्ये समावेश केलेला आहे एरवी आशा कामाची दखल घेतली जाणे तसे दुरावस्त पण राहिबाई पोपेरे ना हा सन्मान मिळाला आहे.

यंदाचे वर्षे जागतिक स्त्री हक्क वर्षे असल्याने ह्याचे औचित्य साधूनBBCकडून इतर महिलांसमवेत गौरव करण्यात आला.६०देशांतील लेखक,पञकार,कलावंत इत्यादी मध्ये पोपेरे यांचा दिमाखात समावेश आहे.

देशी बियाणे बँक स्थापन करण्याचे मोठे राहिबाईनी केले.जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात त्यांचा उल्लेख 'मदरआँफ सीड'असा केला आहे.त्यामुळे त्या बीजमाता म्हणून परिचित आहेत .

राहिबाई ह्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावातील आदिवासी समाजातील निरक्षर पण निसर्गाच्या शाळेत त्या खुप काही शिकलेल्या आहेत.पारंपारिक पध्दतीने त्या बियाणे गोळा करायच्या व शेती मध्ये पीक घेत.पुढे 'बायफ'संस्थेच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला गती मिळाली.त्यांनी गावरान बियाण्यांची बँक स्थापन केली आज त्यांच्याकडे ५४पिकाचे११६जातींचे वाण आहेत.प्रत्येक बियाण्याची माहिती त्यांच्या तोंडपाठ आहे .आता पर्यत त्यांना अनेक राष्ट्रीय वआंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत .

विष्णू तळपाडे