नागपुरात ट्रेलर-स्कुल बसची धडक:५० विद्यार्थी किरकोळ जखमी 

 ट्रेलर चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

अरुण कराळे/वाडी (नागपूर) : - 
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या वडधामना येथील  भारत गर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर स्कुल-बस व ट्रेलर मध्ये जोरदार  धडक झाली असता ट्रेलर चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळून ५० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.

प्राप्त माहितीनुसार काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथील  स्कुल ऑफ स्कॉलर शाळेची शैक्षणिक सहल वडधामना येथील  हायलँड पार्क येथे स्वतःच्या चार बसेस मध्ये एकूण १७०  विद्यार्थी व २४ शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यासह ठरल्याप्रमाणे निघाली असता तीन बसेस समोर निघून सहलीच्या नियोजित स्थळी पोहचल्या परंतु बस क्रमांक  एम . एच .३१ एफ सी ०६९५  मागे होती बस चालक सुरेंद्र महादेव टेकाडे वय ५२ राहणार , सदमा नगर , काटोल याला सहलीचे नेमके स्थळ माहीत नसल्याने तो वडधामना ओलांडून समोर आल्याचे लक्षात येताच रस्ता दुभाजकाच्या गॅपमधून विरुद्ध बाजूने( राँग साईड)बस वळवीत असतांनायाच सुमारास अमरावती कडून नागपूरकडे येणाऱ्या ट्रेलर क्रंमांक एन . एल .०२ एल २६७४ भारी मेट्रोच्या कामाचे गर्डर क्र.एस २ / १o घेऊन नागपूरच्या दिशेने येत असतांना बस विरुद्ध दिशेनी येत असल्याचे ट्रेलर चालक सुखसिंग घरदेवसिंग वय ३३ राहणार  फिरोजपुर (पंजाब ) यांच्या लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य क्षणात लक्षात घेऊन स्कुल बस सोबत होणारी धडक वाचविण्याकरिता रस्त्याच्या बाजूला असलेल्या गायत्री ट्रेडर्सच्या दुकानाकडे ट्रेलर वळवून होणारा मोठा अनर्थ प्रसंगावधाने टाळला.

बसमध्ये ५o विद्यार्थ्यासह ६ शिक्षक सहभागी होते. ट्रेलरचे कॅबीन पूर्णपणे तूटल्या गेली असून गायत्री ट्रेडर्सची सरंक्षण भिंत तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .तर बसमधील अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.नियमाप्रमाणे शाळेची सहल काढतांना शिक्षण विभागाची तसेच आवश्यक बाबीची पूर्तता केली काय?यासंदर्भात माहिती घेतली असता परवानगी घेतली असे फोनवर सांगितले तर सहलप्रमुख रवींद्र भामकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी समाधान कारक व्यवस्थित माहिती सांगीतली नाही.
वाडी पोलिसांनी बस चालकांवर गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील  तपास करीत आहे.