वरोरा येथील व्यापारी शब्बीर बोहरा यांचा घराला आग

शहरातील इंडिया बँक जवळील घटना : घरातील संपूर्ण साहित्य जाळून खाक

प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल : आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्टशिरीष उगे (प्रतिनिधी)
वरोरा शहरातील प्रसिद्ध व्यापारी शब्बीर बोहरा यांचा राममंदिर वार्ड येथील राहत्या घरी आज दि.18 डिसेंबर ला सायंकाळी 10 वाजताच्या दरम्यान आग लागली असून या आगीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले आहे.या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस यंत्रणा, नगर परिषद प्रशासन, महावितरणची टीम तसेच अग्निशमन दल दाखल झाले आहे. नागरिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रित मिळविण्यात यश आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.यावेळी घटनास्थळी मुख्यधिकारी सुनील बल्लाळ, नगराध्यक्ष अहतेशम अली, महावितरणचे चूक्का व शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, संदीप भडके , विलास नेरकर आदी उपस्थित होते.