पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणारा तरुण ताब्यात


पुणे/ प्रतिनिधी
लष्कराच्या गणवेशात वावरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाकडे एक बनावट ओळखपत्र आढळून आलं आहे. तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं वानवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. वानवडीच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये एक तरुण लष्कराच्या गणवेशात फिरताना आढळून आला. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आणि कमांड हॉस्पिटल लष्कराच्या हद्दीत येतो. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी कमांड हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. याच भागात एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना दिसला. या तरुणाला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे लष्कराचा गणवेश आणि बोगस ओळखपत्र आढळून आलं. या तरुणाची वानवडी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.