गोंदिया-विविध विकास कामाचे भूमिपूजनगोंदिया,दि.17 : जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुक्यातील कोसमघाट येथे ३०५४ योजनेंतर्गत कोसमघाट - चिखली रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, २५१५ योजनेंतर्गत सावंगी येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता तथा ३०५४ योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सौंदड येथील चावडी बांधकाम, रस्ता खडीकरणाच्या कामाचे व संत तुकाराम महाराज समाज सभागृहाजवळ आवारभिंत बांधकामाचे भूमीपूजन तसेच राका येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, भूमिपूजन करण्यात आलेल्या कामाची लवकरच सुरुवात करण्यात येऊन दर्जेदार कामे करण्यात येतील. यावेळी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य मंजू डोंगरवार, तहसिलदार राजेंद्र अरमरकर, सार्वजनिक बांधकाम जि.प.उपअभियंता प्रकाश ताकसांडे, कोसबी ग्रामपंचायत सरपंच अलका रामटेके, चिखली ग्रामपंचायत सरपंच सुधाकर कर्वे, राका ग्रामपंचायत सरपंच रेखा चांदेवार, सावंगी ग्रामपंचायत सरपंच शेरुखाँ पठाण, सौंदड ग्रामपंचायत सरपंच गायत्री इरले व सामाजिक कार्यकर्ते हर्ष मोदी उपस्थित होते.