निःशुल्क आरोग्य व स्त्री रोग निदान शिबिर

नागपूर - आज भाजपा प्रभाग क्र.13, महिला समाज राम नगर, आयकॉन हॉस्पिटल व जननी सेहत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला समाज सभागृह, बाजी प्रभू नगर, नागपूर येथे निःशुल्क आरोग्य व स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन मा.आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेविका डॉ.परिणीता फुके, नगरसेवक अमर बागडे, डॉ.रोहिणी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, स्त्री रोग, हाडांची व सामान्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.रोहिणी पाटील यांनी कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनुराधा कुऱ्हेकर, रश्मी रानाडे, प्रभा देऊस्कर, आसावरी देशमुख, डॉ.वनमाला क्षिरसागर, सई देशपांडे, डॉ.अंजली परंदीकर, व समस्त महिला मंडळ यांनी प्रयत्न केले .