महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रंथ भेट

मनोज चीचघरे/ पवनी भंडारा:

भारतीय लोकशाहीला भक्कमपणे यशाच्या शिखरावर नेणारा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय ग्रंथ " भारतीय संविधान " व जगाला समता , स्वातंत्र्य व बंधुतेची शिकवण देवून प्रज्ञा व करूणा स्थापित करणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माची अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित महान ग्रंथ " बुद्ध आणि त्यांचा धम्म " हे दोन ग्रंथ अॅड.महेंद्र गोस्वामी यांनी पवनी वकील संघाचे सचिव अॅड. योगिराज सुखदेवे यांना प्रदान केले.
भारतरत्न परमपूज्यनिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी हे दोन्ही ग्रंथ वकील संघाला भेट दिले.

यावेळी अॅड. महेंद्र गोस्वामी यांचे सोबत पवनी तालुक्यातील जेष्ठ वकील अॅड. सुधाकर भुरे व अॅड. खुशाल अंबादे होते.