वाडीत सीएम चषक उजाला गायन स्पर्धेचे थाटात उदघाटन


वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे येथील भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे शिलादेवी पब्लीक स्कूल समोरील मैदानावर शनिवार १५ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता सीएम चषक उजाला गायन स्पर्धेचे थाटात उदघाटन वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे व नागपूर पं .स.चे उपसभापती सुजीत नितनवरे यांच्या हस्ते करण्यात आले . या स्पर्धेत १६ वर्षाखालील व १६ वर्षावरील अशा दोन गटात स्पर्धा आयोजीत केली असून या स्पर्धेत एकूण १२० गायक स्पर्धकांनी भाग घेतला आहे . परिक्षकांची जबाबदारी सच्चिदानंद संगीत विद्यालयाचे प्रा .विनायक कराडे, हरिहर महल्ले व संध्या पानसे यांनी सांभाळली .यावेळी माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक नरेश चरडे , नगरसेवक केशव बांदरे, महीला बालकल्याण सभापती कल्पना सगदेव , भाजयुमोचे वाडी शहर अध्यक्ष महेश रागीट , आनंदबाबू कदम ,आदर्श पटले , कमलाकर इंगळे ,दिनेश कोचे , राकेश मिश्रा , सरीता यादव , राजूताई भोले , उर्मीला चौरसीया , ज्योती भोरकर , मंगला पडोळे , मंदा कदम , भिमराव मोटघरे , इंशात राऊत , राकेश ठाकरे, नितीन फटींग , अक्षय तिडके, रोहीत बावने , हरमनसिंग , रोहीत तायडे , प्रतीक बांदरे, वैभव शिरभाते , कृष्णा उपाध्याय , विक्की भुरे, श्याम शर्मा , दांडेकर , अॅड .महादेव भंडागे, राजीव दळवी भारतभुषण देशमुख आदी उपस्थित होते .