शि.स.कर्मचारी प्रत्यय संस्थेने निवड केले नवनिर्वाचित तरुण पदाधिकारी

चिमूर/रोहित रामटेके:
जिल्हा परिषद प्राथ. शिक्षक सहकारी कर्मचारी प्रत्यय शिक्षक सोसायटी ही चिमूर येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने जनमाणसात रुजलेली आहे. ही संस्था कार्यकर्तुत्वने अजरामर आहे. इथे पुरोगामी शिक्षक सघंटनेची सत्ता तिस वर्षापासून आहे. संस्थेमधे सर्व शिक्षकांनी एकमताने अविरोध तरून पदाधिकाऱ्यांची निवड करून संस्थेच्या विकासासह सभासदांचे हित जोपासले आहे.

दिनांक २ डिसेंबर २०१८ ला तरुण पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली दरम्यान नवनिर्वाचित पदाधिकार्यांमधे अध्यक्ष पदी श्री गोविंद गोहणे, सचिव पदावर श्री विनोद महाजन, तर खजिनदार श्री प्रभाकर गोपाळा लोथे असे पदाधिकारी आहेत.
नवनिर्मित पदधिकार्यांच्या स्वागतावेळी शिक्षक सभसदामधे श्री ना.रा. काबंळे सर, श्री तुर्के सर, श्री ता.रा .दडमल सर, श्री व्ही.एन. मुरकुटे सर, श्री विनोद हटवार सर, श्री नरेंद्र मुंगले सर, श्री तुकाराम उरकुडे सर, श्रीनंदनवार सर आणी इतर सर्व शिक्षक मंडळी ऊपस्थीत होते.ही संस्था जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रत्येक हितासाठी झुंजरु स्वरुपाने झटत असते,