चंद्रपुरात कॉंग्रेसला आठवले राम;चंद्रपूरच्या मंत्र्यांना सदबुद्धी देवो प्रभू श्रीराम

चंद्रपूरचे आमदार झाले WANTED
नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूरात शहर कॉंग्रेस कमिटीने चंद्रपुरातील दोन मंत्र्यांना टार्गेट करत शुक्रवारी  १ दिवसीय सदबुद्धी देवो आंदोलन केले.शहरातील शासकीय रुग्णालय तथा महाविद्यालय समोर हे आंदोलन करण्यात आले. ज्यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना प्रभूश्रीराम सदबुद्धी देवो,अशी मागणी करण्यात आली ,या आंदोलन मंडपात प्रभू श्रीरामाचे मोठे फोटो लावण्यात आले होते.
कॉंग्रेसने मंत्र्यांना तर बुद्धीची माग्नित्र केलीच मात्र चंद्रपूरच्या आमदारालाही धारेवर घेतले,चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांना शहरातून WANTED  करत मोठा फोटा लावला.आपण यांना पाहिलत का ? अश्या आशयाचा  आमदार शामकुळे यांचा फोटो या कार्यक्रमाप्रसंगी लावण्यात आला.
चंद्रपूर शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या जाते. आता शहरात अमृत योजनेमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चंद्रपूरचे आमदार शहरात दिसतस नाही,मागील ०६ महिन्यापासून १५० नवजात बालकांचा मृत्यू  झाला याला जबाबदार कोण ? रुग्णांना मोफत औषधी मिळत नाही,याला जबाबदार कोण ? हफकिण नावाची कंपनी मर्यादा संपलेल्या औषधीचा पुरवठा करीत आहे. यावर कारवाई का नाही?  रुग्णालयात बेडचा तुटवडा आहे , डॉ. बी. डी. नाखले हे अधीक्षक आहे ते कायम स्वरूपी नाह, कंत्राटी कामगारांना मागील ०६ महिन्यापासून वेतन नाही, आ. सी. यू. मशीनची अवस्था बिकट आहे , डॉक्टरांचा तुटवडा, पुरेसा स्टाफ नाही. रुग्णांना फी चे दर जास्तीचे आकरण्यात येत आहे, त्याचा जबाबदार कोण? शासकीय रुग्णालयातले रुग्ण खासगी रुग्णालयात पाठवीत आहे, याचे दोषी कोण ? सी. टी. स्कॅन, एक्स – रे, सोनोग्राफी, चे दर सन २०१४ पेक्षा जास्ती आकरण्यात येत आहे. शासकीय महाविद्यालयाचे बांधकाम कधी सुरू होईल? जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या बांधकामात अनियमितता, भ्रष्ट्राचार, निकृष्ट दर्जाचे आहे. शस्त्रक्रियेची सामुग्री निकृष्ट दर्जाची आहे. जैनेरीक मेडिकल मध्ये आवश्यकते नुसार औषधीसाठा नाही. पार्किंग ची व्यवस्था नाही. खासगी रुग्ण वाहिकेच्या नावावर लूबाडणूक होत आहे. कुशल व अकुशल कंत्राटी कामगारांची निविदा झाल्यानंतरही कार्यवाही नाही. स्वच्छता नाही. भोजनाचा दर्जा बरोबर नाही. वार्डन पेशंट कडून पैसे  उखडल्या
जाते,  यावर कुणाचा अंकुश नाही.अश्या समस्यांचा पाढा ठेवत हे आंदोलन करण्यात आले होते.


या आंदोलनादरम्यान अनेक रुग्ण पेंडाल मध्ये येवून स्वताची आप बिती सांगत होते. वरील सर्व सुविधा त्वरित सुरू करण्यात आल्या नाही तर चंद्रपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी तालाठोको आंदोलन करणार आहे.
यावेळी चंद्रपुर शहर जिल्हा कॉंग्रेस कामेटी अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढिया, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अँड. मलक शाकिर, देवराव पाटील धोटे, महिला शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल, असंघटित कामगार विभाग जिल्हा सरचिटणीस हरीदास लांडे, फारूक सिद्धक्की, शलिनी भगत, वंदना भागवत, बळीराज धोटे, संजय बुटले, शंकर बावणे, दीपक कटकोजवार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, मोहन डोंगरे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका संगीता भोयर, देवराव पाटील धोटे, घनश्याम वासेकर, राजू दास, विनायक साकरकर, राजू अवघडे, संजय गंपावार, विनोद नालमवार, हरीदास डाखरे, सुरेश आत्राम, मंगला मडावी, बंडोपंत तातावार, श्याम राजूरकर, राजा काझी, राजेंद्र आत्राम, विकास टिकेदार, कुमारस्वामी पोतलवार, रुचित दवे, नितिन नंदीग्रामवार, सुरेश दुर्षेलवार, अजय बल्की, गौतम गेडाम, पुंडलिक लांबट, विजय ठोबरे, वैभव बानकर, शशाकर हलदार, अजय खनके, युवराज दास, अरबाज खान, चन्दन अधिकारी, संजय राऊत, विशाल दास, मंगेश धोटे, ज्योशना रॉय, भारती दास, कविता मानेकर, संगीता मुळे, विना वांढरे, प्रीती कोठारकर, उज्वला रामटेके, रिंकू कोंडागुर्ला, रेणुका मंडल, वैशाली तडसे, शांता टेकाम, संगीता पेंदाम, चेतना भगत, उज्वला रमटेके, मंजूषा पाल, हेमंत अधिकारी, नावेद काझी, मुकेश सोनी, राणा पवार, वसंतराव रायपुरे आदि कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.