स्वच्छतेबाबत मार्गदर्शन




मनोज चिचघरे/प्रतिनिधी, भंडारा
दिनांक 15/12/2018 ला शाश्वत स्वच्छते बाबत ग्रामपंचाय पालोरा येथे जि. प.भंडारा येथील Additional Co सपाटे सर.तसेच स्वच्छता व पाणी विभाग भंडारा, स्वच्छता अधिकारी,मा.गभने सर,मा.भदे सर प.स.स्तरावरील श्री.गणवीर यांनी भेट दिली व गावकरी लोकांना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.अनिता संदिप गिऱ्हेपुंजे यांनी सरांचे स्वागत व आभार मानले. स्वच्छते बाबत Co सर स्वतः ग्रामपंचायतला येऊन मार्गदर्शन केले.व तसेच मा.गभणे सरांनी सर्व ग्रामपंचायात सदस्य तसेच गावातील नागरीकांना स्वच्छता व घनकचरा,तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थे बाबद छान मार्गदर्शन केले व त्यातील महत्त्व पठवून सांगितले .तालुका स्तरावर पालोरा हे गाव नेहमीच स्वछते च्या बाबत चर्चेत असते.गावात स्वछते बाबत कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. नेहमी गावात आठवळ्यातुन एकदा लोकसहभागातून संपुर्ण गाव स्वछ केल्या जाते .ग्रामपंचायतला मा.सरपंच मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली युवा मंडळी तसेच गावातील जेष्ट मंडळीची ऐक मिटींग घेतल्या जाते व गावातील स्वछते बाबत व गाव विकासा बाबत चर्चा केल्या जाते .तसेच आजच्या मिटींगला सुद्धा सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला . उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य गण.श्री कैलास दिघोरे, अंबादास धारगावे, देवानंद खोपे,महिला सदस्य गण सौ.सुनीता मस्के, ज्योतीताई शहारे, रविताताई धारगावे,जि.प.वस्ती शाळेतील शिक्षक श्री.रामचंद्रजी धारगावे सर श्री.सुबोधजी धारगावे, महिला बचत गटाच्या महिला व गणेश मांडळाचे सदस्य प्रकाश गिऱ्हेपुंजे तसेच इतर सदस्य,आशा वर्कर डुंबरे व गावातील नागरिक त्यावेळी उपस्थित होते सरपंच सौ.अनिता गिऱ्हेपुंजे ह्यांनी गावातील नागरिकांचे आभार मानले व असेच नेहमी गावाच्या विकासासाठी सामोर येण्यासाठी मार्गदर्शन केले.