कोतवांलाचे बेमुदत कामबंद आंदोलन


चिमूर/रोहित रामटेके

चिमूर -कोतवाल हा महसुलचा प्रमुख घटक असून त्यांना तोकड्या मानधनावर राहुन आपल्या कुंटूबांचा उदरनिर्वाह करावा लागतो. यापुर्वी शासनाला कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा म्हणून अनेक आंदोलने, उपोषण व प्रस्ताव सादर करन्यात आला मात्र शासनाला अजुनपर्यत जाग आली नाही. म्हनून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या समर्थनात तालुका शाखा चिमूर कोतवाल संघटनाने बेमुदत काम बंद आंदोलन करन्याचा निर्णय घेतला असून शुकवार पासुन तहसील कार्यालय समोर चिमूर कोतवाल संघटना कामबंद आंदोलनास बसली आहे.
          कोतवालांना महसूल गोळा करने, नैसर्गीक आपत्तीच्या काळात वेळोवेळी सुचना देने, नोटीस तामील करने, कृषीगणना, संगणीकृत सातबारा, रेकार्ड रूम निवडणुकीचे काम व इतर स्वरूपाची कामे करावी लागतात. कोतवालांना चतुर्थश्रेणी देन्याकरीता वेळोवेळी आंदोलने, उपोषणे व मोर्चा काढून शासनाला श्रेणी देन्या प्रस्ताव सादर करन्यात आला. गेल्या पन्नास वर्षापासून कोतवाल आल्या हक्काची मागणी करत आहे मात्र शासन दखल घेत नाही. त्यामुळे चिमूर तालुका कोतवाल संघटनेतील एकतीस कोतवालांनी चिमूर तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या संदर्भात तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन देन्यात आले. निवेदनातुन कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा मिळाला पाहीजे याकरीता मुख्यमंत्री, महसुल मंत्री, अर्थमंत्री मुख्य सचिव महसूल अर्थ कोतवालांची मागणी रास्त असल्याचे आपल्या कार्यालयामार्फत पाठविन्यांची विनंती निवेदनातुन तहसिलदार यांना चिमूर कोतवाल संघटनांनी केली आहे.
     

  जोपर्यत मगन्या पूर्ण होनार नाही तो पर्यत काम बंद आंदोलन सुरूच राहनार असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालूका शाखा चिमूर चे अध्यक्ष विनोद रामटेके, उपाध्यक्ष प्रफुल मेश्राम, सचिव राहुल सोनटक्के, नागसेन वाघमारे, प्रशांत खेडकर, दयाराम वंजारी, गणेश बारसागडे, प्रमोद गजभे, मनोज उके, संदिप कुमरे आदीनी केली आहे.