23 जानेवारी रोजी आदिवासी मुलांसाठी रोजगार मेळावा


       चंद्रपूर, दि.21 जानेवारी  चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या अंतर्गत येणा-या चिमूर, भद्रावती, वरोरा, नागभिड, व ब्रम्हपूरी तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी सदर कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत.  अशा विद्यार्थ्यांनी 23 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता मिलन सांस्कृतीक सभागृह चिमूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला अवश्यक उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
            तसेच या प्रकल्पाच्या अंतर्गत येणा-या आयटीआय, पॉलीटेक्नीक, इंजिनिअरींग, बि.फॉर्म, डि.फॉम उत्तीर्ण उमेदवार तसेच बी.ए, बीकॉम, बीएससी, 12 वी व 10 वी उत्तीर्ण झालेल्या संवर्गातील अर्ज केलेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी 23 रोजी सकाळी आपल्या नावाची नोंद करुन येणा-या कंपन्यासमक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. तसेच ज्या मुलांनी यापूर्वी नोंदणी केलेली नाही अशाही उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहता येणार आहे. तेव्हा वरील सर्व तालुक्यातील आदिवासी उमेदवारांनी या मुलाखतीस येतांना अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व शैक्षणिक दाखला या सर्व कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी केले आहे.