दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना

रोहित रामटेके/चिमूर:

  तालुक्यामध्ये अनेक लहान मोठ्या संघटना कार्यरत आहेत, कोनत्या संघटना शासकीय तर कोणत्या खाजगी स्वरूपात अनेक संघटना दिसतात. कोणत्या संघटना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत कोणत्या संघटना कामगारांच्या अशा अनेक आहेत. पण चिमुरात टायगर ग्रुप अशा नावाने तरुण तडपदार युवकांची संघटना स्थापन करण्यात आले आहे.
 यामध्ये विशाल बारापात्रे,पियुष गोपाले, शुभम बाळचने, शुभम पसारकार,अंकित गरमळे,आयुष बांगडे,प्रणय मेश्राम,रोहन नंन्नावरे,हिमांशू झालवडे,अक्षय शेंडे,अंकित वाडई,ओमकार पांडे,लखनभाऊ चटपकार, अजय केशकर, पवन डोंगरावर,आदित्य कडू,अभिषेक कोलपलवार,अजय ढगे, मिथुन शेषकर या सर्व सदस्यांचा समावेश या संघटनेत आहे. या संघटनेचे कार्य हे वंचित, दुर्बल आणि अडलेल्या अनेक गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संगटनेची स्थापना आज हुतात्मा स्मारक चिमूर येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते या टायगर ग्रुप चे उदघाटन करण्यात आले.
 त्यामध्ये मान्यवर मा. श्री.अनिल जाधव शेगाव,मा.श्री.मनोज एगलवार सिंदेवाही,मा.श्री.विलास राठोड बल्लारशा, मा.श्री.सलीम पठाण गुजगव्हान, मा.श्री.तुषार येरमे वरोरा,मा.शुभम समुद चंद्रपूर,मा.श्री.नितीनभाऊ कटारे जिल्हाध्यक्ष हिंदू क्रांती सेना. आदी मान्यवर उपस्थित होते.