गुरूवारी विधानभवनात मा सा कन्नमवार जयंती


नागपूर - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, बहुजन नायक व विदर्भ पुत्र मा सा कन्नमवार यांची जयंती गुरुवारी (ता 10) विधानभवन प्रांगणात साजरी करण्यात येणार आहे.
बेलदार समाज संघर्ष समिती (महा प्रदेश) तर्फे आयोजित या कार्यक्रमात सकाळी 10. 30 वाजता माजी मुख्यमंत्री मा सा कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
यंदाच्या या कार्यक्रमाला काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी खासदार नानाभाऊ पटोले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रविण कुंटे पाटील, महापौर नंदाताई जिचकार, नासुप्र विश्वस्त भूषण शिंगणे उपस्थित राहणार आहेत.
या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कन्नमवार दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात येणार आहे. तद्नंतर दादासाहेब कन्नमवार यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.
 या कार्यक्रमाला भटक्या विमुक्त, बेलदार समाज व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेलदार समाज संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र बढिये, संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, खिमेश बढिये, विनोद आकुलवार यांनी केले आहे.