सोनेगाव जि.प.शाळेत लेक वाचवा,लेक शिकवा अभियान

नागपूर / अरूण कराळे:

नागपूर तालुक्यातील सोनेगाव ( निपाणी ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत लेक वाचवा, लेक शिकवा अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा व बाल आनंद मेळावा याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन ग्रा.पं.सदस्य विनोद लंगोटे यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख मार्गदर्शन केंद्रप्रमुख शरद भांडारकर व अदीती बालपांडे यांनी केले . यावेळी वर्ग ३ते ७ च्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे २० स्टॉल लावून सर्वच स्टॉलवरील वस्तुंची विक्री झाली. 

विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार समजावे,नोटा ,नाणी यांची ओळख व्हावी, बाजारातील व्यवहारज्ञान समजावे तसेच गणित, कला ,भाषा ,भूगोल या विषयांतील संकल्पना द्रुढ व्हाव्यात व क्षमतांचे द्रुढीकरण व्हावे हा यामागील उद्देश असल्याचे मुख्याध्यापक प्रकाश कोल्हे यांनी सांगीतले . बाल आनंद मेळाव्याला विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रकाश कोल्हे, विज्ञान शिक्षक राजाराम मेंघळ,पदविधर शिक्षक प्रवीण मेश्राम ,शिक्षीका नीलिमा कामथे, शिक्षिका मेघा आकरे, शिक्षिकासुजाता भानसे, शिक्षिका सुरेखा धोटे शिक्षिका सुरेखा,सुनंदा वाघाडे आदींनी सहकार्य केले.