गायत्री परिवारातेर्फे कन्या कौशल्य शिबिर व हायमास्ट लाईटचे लोकार्पण

मनोज चीचघरे/पवनी/भंडारा:

गायत्री परिवार ट्रस्ट, जवाहर नगर, राजेंदहेगाव ता.जि. भंडारा तर्फे रजत जयंती वार्षिक उत्सव कन्या कौशल्य शिबिर व हायमास्ट लाईट चे लोकार्पण सोहळा आज राजेंदहेगाव ता.जि. भंडारा येथे पार पडला.
गायत्री परिवार ट्रस्ट, राजेंदहेगाव करिता आमदार डॉ.परिणय फुके यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून हायमास्ट लाईट ला मंजुरी दिली असून या हायमास्ट लाईट चे लोकार्पण आज आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी सांगितले की गायत्री परिवार ट्रस्ट ला 'क' तिर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विविध विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी शक्तीपीठ प्रमुख आद. फरिंगजी महाराज, जि. प.सदस्य श्री चंद्रकांतजी दुरुगकर, मा.यशोदाताई, मा.मंजुताई राठोड, मा.उमा पांडे, मा.मंदाकिनी तिवारी, मा.सुधा महाजन, मा.शामा राठोड, मा.अमितजी वसानी, मा.संतोषभाऊ मालेवार, मा.पंकज सुखदेवे, मा.श्रीकांत अय्यर, मा.सोनाजी खन्ना व मोठ्या संख्येने कन्या व भक्त गण उपस्थित होते.