माळी समाज जुनोना अध्यक्ष पदी मेघश्याम पेटकुलेंची निवड


चंद्रपूर/अमोल जगताप:

विविध सामाजिक कार्यात सहभागी असणारी सत्यशोधक कोसरे माळी समाज जुनोना ची नव्याने कार्यकारिणी मंडळ ची निवड करण्यात आली. ह्या मध्ये अध्यक्ष म्हणून श्री. मेघश्याम वासुदेव पेटकुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली, उपाध्यक्ष बेबीताई वाडगुरे, कोषाध्यक्ष श्री मनोज लेनगुरे, सचिव सौ. सुरेखाताई आदे, व सदस्य सौ. अर्चनाताई चौधरी, सौ. मायाताई बोरूले, सौ. वनिताताई मोहूर्ले, सौ. आशाताई चौधरी, सौ. वीणाताई ढोले,सौ. सुनीताताई मोहूर्ले, बेबीताई वाडगुरे, कु. काजल कोटरंगे, सचिन जेंगठे, श्री. परशुराम आदे, श्री. रुपदास गुरनुले, मुकेश नागोसे, श्री. बंडू महाडोळे, अजय वाढई यांची निवड झाली.