मल्टी ऑर्गनिक्स विरोधात मुंडण आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

एमआयडीसी परिसरातील मल्टी ऑर्गनिक्स कंपनी रासायनिक कचरा सोमुर्ली, दाताळा नाला, वनजमिनीवर टाकत आहे.यामुळे या कंपनीलगत असलेल्या सहा गाबांतील पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत.

 याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने संजीवनी पर्यावरण संस्थेने मंगळवारपासून प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे.
उपोषणाच्या दुसर्या दिवशी व म्हणून या भ्रष्ट अधिकारी व कंपनीच्या निषेधार्थ आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी राजेश बेले यांच्या नेतृत्वात मुंडन आंदोलन करण्यात आले,मल्टी ऑर्गनिक्स कंपनी मानवी, वन्यप्राण्याच्या जिवितास धोकादायक ठरणारे रासायनिक पाणी, वायू प्रदूषणकरीत आहे. त्यामुळे चंद्रपूर, चिंचाळा, खुटळा, लहुजीनगर, म्हाडा कॉलनी, देवाडा आणि दाताळा या गावांतील पाण्याचे स्त्रोत दूषित झाळे आहेत. त्यामुळे ही कंपनी बंद करावी यासह अन्य मागण्यांना घेऊन उपोषण सुरू आहे. शैलेश जुमडे, सागर जोगी, नितीन पिंपळशेंडे, धोपटे यांच्यासह अन्य सदस्य उपोषणाला बसले आहेत.