उज्वलामुळे फुलले महिलांच्या चेहऱ्यावर हास्य

अनिल पवार/उमरेड: 

चांपा येथे गोरगरिबांना उज्वला योजने अंतर्गत २०महिलां लाभार्थ्याना आज  गॅस उपलब्ध करुन दिल्यामुळे महिलांच्या चेह-यावर हास्य फुलले आहे. ग्रामीण भागात पांरपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर झालेच त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. घरगुती इंधनासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती. परंतु या योजनेमुळे ग्रामीण भागातील घरापर्यत एल.पी.जी. सिलेंडर पोहचले आहे. 

चांपा येथील ग्रामपंचायत च्या सभागृहात इंडिअन गॅस कंपनी यांच्या वतीने चांपा गावातील गोरगरिब लाभार्थी महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वल योजने अंतर्गत आज सरपंच अतीश पवार यांच्या वतीने 20 गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.चांपा ग्रामपंचायत सरपंच अतीश पवार यांच्या हस्ते चांपा परीसरातील चांपा , खापरी , मांगली येथिल 20 लाभार्थी महिलांना उज्ज्वल योजनाच्या माध्यमातून इंडीयन गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. तसेच, इतर महिलांनी उज्ज्वल योजनेचे नवीन गँस कनेक्शन मिळावे म्हणुन यावेळी नोंदणी केली आहे. चांपा परिसरात गॅसमुळे महिलांची चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या त्रासातुन मुकत्ता होणार आहे, असे यावेळी सरपंच अतीश पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निश्चित कमी होतील, सर्वांना गॅसवर स्वयंपाक बनिण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. कार्यक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत चांपा येथिल सरपंच अतीश पवार यांनी केले .