कृषिप्रदर्शनीत महावितरणच्या स्टॉलला ६ हजाराहून अधिक नागरिकांनी दिली भेट

चंद्रपूर/प्रतिनिधी:

स्थानिक क्लब ग्राउंड येथे दिनांक 11 जानेवारी ते 15 जानेवारी2019 दरम्यान पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदशर्नीत महावितरणद्वारा लावण्यात आलेल्या माहितीपर स्टॉलला जनतेने / शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने भेट ‍दिली व माहिती जाणून घेतली. महावितरणच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्टॉलला भेट देणाऱ्या जनतेस त्यांना हवी असलेली माहिती येाग्य प्रकारे देवून मार्गदर्शन केले.
महावितरणद्वारा लावण्यात आलेल्या स्टॉल मधून शेतीविषयक सुरक्षा उपाय योजना, कॅपॅसिटरच्या वापरातून होणारे फायदे, सुरक्षा, मोबाईल ऑपचा वापर करून वीजबिल भरण्याची सोय इ, गो ग्रीन सूट, सौर ऊर्जा, एच व्ही डी एस इत्यादी योजना बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. 

महावितरणच्या या स्टॉलमधून जनतेस देण्यात येणाऱ्या महावितरणच्या या स्टॉलला जवळपास 6000 पेक्षा अधिक जनतेने / शेतकरी बांधवांनी भेट देत माहिती जाणून घेतली.
महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.अरविंद भादीकर, चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक म्हस्के, चंद्रपूर विभागाचे, कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. विजय चावरे, सहाय्यक अभियंता -प्रशांत आवारी, दीपक खामणकर , विनायक चव्हाण, शिल्पा महेशगौरी, वैशाली बारापात्रे , गिरीश गजबे, भुसारी यांनी स्टॉल च्या माध्यमातून महावितरणच्या विविध ग्राहकोपयोगी उपक्रमाबद्दल कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना माहिती दिली.