स्वामींनी हिंदूस्थानची मान जगात उंचावण्याचे काम केले:दिपक दुधाने

वाडीत शिशु गर्भसंस्कार समारोह
 अरुण कराळे/नागपूर:

स्वामी विवेकानंद यांनी मानवजातीच्या उध्दाराचे कल्याण केले असुन त्यांनी हिंदूधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी न्यूयार्क मध्ये अभ्यासवर्ग सुरु केले.अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले.हिंदूधर्म, तत्वज्ञान यांचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले .हिंदूधर्म व हिंदूस्थानची मान जगात उंचावण्याचे काम त्यांनी केले असे प्रतिपादन दिपक दुधाने यांनी केले . दत्तवाडीतील पुण्याई सभागृह मध्ये शनिवार १२ जानेवारी रोजी वाडी नगर परिषद व गायत्री परिवार यांच्या संयुक्त सहकार्याने स्वामी विवेकानंद ,राजमाता जिजाऊ व सावीत्रीबाई फुले यांची जंयती व शिशु गर्भसंस्कार समारोह कार्यक्रम पार पडला त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते . 
व्यासपीठावर दिपक दुधाने ,प्रमुख वक्ते म्हणून वैशाली चोपडे , प्रमुख पाहूणे म्हणून वृंदा समीर मेघे , बांधकाम सभापती हर्षल काकडे , शिक्षण सभापती मिरा परिहार , आरोग्य सभापती शालिनी रागीट , उपसभापती आशा कडू , महीला महामंत्री राजुताई भोले, भाजपा वाडी महिला अध्यक्षा ज्योती भोरकर , मंदा कदम , संगीता चरडे , श्रध्दा राऊत प्रामुख्याने उपस्थित होते .अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. असे मार्गदर्शन वैशाली चोपडे यांनी केले.

 छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्याची संपुर्ण जबाबदारी जिजामातेने स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं असे प्रतिपादन बांधकाम सभापती हर्षल काकडे यांनी केले . महीलांनी सकारात्मक विचारावर भर देऊन राजमाता जिजाऊ व सावीत्रीबाई फुले यांच्या विचारावर भर दयावा असे आवाहन वृंदा मेघे यांनी केले . प्रास्ताविक महीला बालकल्याण सभापती कल्पना सगदेव , संचालन नगरसेवीका सरीता यादव व आभार प्रदर्शन गायत्री परिवाराच्या निर्मला राऊत यांनी केले . यावेळी गर्भवती स्त्रीयांना पोषण आहार देण्यात आला . कार्यक्रमाला अंगणवाडी सेवीका, गायत्री परिवार व परिसरातील मोठया संख्येने महीला उपस्थित होत्या .