उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे जैसे थे : संबंधित विभागाचा अधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर

तुमसर (दि. २ जानेवारी) : 

रस्ते सरळ असावेत वळणमार्ग शक्यतो सरळ करावे असा रस्ते महामार्ग खात्याचा नियम आहे, परंतु तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पोचमार्गाला जोडणारा रस्ता यु- टर्न करण्यात आला आहे. खापाकडून देव्हाडी रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक वाहने रेल्वे फाटक मार्गाएवजी देव्हाडी गावातील अंडरपास मधून जातात. त्यांना रेल्वे फाटकचा रस्ता दिसत नाही. तुमसर- खापा- गोंदिया रस्त्याचा फलक सुद्धा येथे लावण्यात आला नाही. नियमांना येथे बगल देण्यात आली आहे.

खापा मार्गाने येणाऱ्या वाहनांना देव्हाडी रेल्वे फाटक दिसत नाही. ती वाहने देव्हाडी रेल्वे स्थानकाकडे वळविण्यात येतात. पुढे गेल्यावर चूक लक्षात येते. ती वाहने देव्हाडी अंडरपास मार्गाने रेल्वे फटकाकडे वाळवितात. अंडरपास मधून वाहने बाहेर पडतांना धोका आहे. मार्गावरील वाहने येथून भरधाव वेगाने जातात.

यु- टर्न घेतांनी वाहनांना धोक्याची शक्यता आहे. अनेक लहान- मोठे येथे वहनांना अपघात झाले आहेत. रात्री येथे लाईटची सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन वाहन चालकांना पुढे कोठे जावे असा प्रश्न पडतो. चार रस्ते येथे असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने दुचाकी स्लिप होण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत किमान रेल्वे मार्ग दर्शविणारे फलक संबंधित विभागाने येथे लावण्याची गरज आहे.

सदर दि. ०२ जानेवारी, २०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बी. आर. पिपरेवार यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून काम सुरू असलेल्या उड्डाणाच्या ठिकाणी जाऊन अभियंता यांचे लक्ष वेधले गेले तसेच त्यांना उड्डाणपुलाचा दोन्ही बाजूला पोचमार्गाचा आधी तथा जवळ रेडियम, माहिती फलक, किवी रिफ्लेकटर, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऐरोटेक्निन तथा रस्त्यावर आलेले झाडे झुडुपे काटने या मागण्यांचा समावेश होता. यावेळी अभियंत्यांना सुचविलेल्या मागण्या मान्य करून लवकरच पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळामध्ये वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, उपजिल्हाप्रमुख जगदीश त्रिभुवनकर, शिवसैनिक अमित एच. मेश्राम, तालुका प्रमुख गुड्डू डहरवाल, युवासेना तालुका अधिकारी संजू डहाके, शहर अधिकारी प्रवीण गुप्ता, कुणाल कनोजे आदी उपस्थित होते