मार्च पासून जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करा



चंद्रपूर/प्रतिनिधी:
व्यावसायिक अभ्यासक्रम साठी इमेज परिणाम
शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये सामाईक प्रवेश परिक्षा (CET) देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीचे परिपूर्ण प्रस्ताव 1 मार्च ते 31 मे 2019 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपूर येथे सादर करण्याबाबत समितीचे उपायुक्त, विजय एम. वाकुलवार यांनी कळविले आहे.

2019-20 या शैक्षणिक वर्षातील व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून या समितीकडे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी शासनाच्या www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर अर्ज भरून त्याची छापील प्रत तसेच – CET प्रवेशपत्रासह, अर्जदाराचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच जातीचा दावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे प्रमाणपत्रासह सादर करावे. तसेच उमेदवारांनी आपला प्रस्ताव सादर करतांना सोबत सर्व मुळ दस्तावेज स्कॅनिगकरिता आणावेत. सदर अर्ज सादर करतांना उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी 18002330444 या मदत केंद्रावर संपर्क साधून समस्येचे निराकरण करावे, असे समितीचे उपायुक्त विजय एम. वाकुलकर यांनी कळविले आहे.