पालोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन

khabarbat.in


पवनी / प्रतिनिधी

पालोरा चौ येथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा जि. प.पूर्व माध्यमिक शाळा पालोरा चौ.येथे 3 दिवसीय वार्षिक स्नेहसम्मेलन झाले. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री पडोळे सर, व त्यांचे सहकारी सर्व शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती  तसेच  सरपंच सौ.अनिता संदिप गिऱ्हेपुंजे यांच्या सहकार्याने वार्षिक स्नेह संमेलन 3 दिवसीय कार्यक्रम पालोरा येथे आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या उदघाटनाला उपस्थित.उदघाटक जि.प.सदस्या भुसारी मॅडम, तसेच बालुभाऊ हजारे युवा काँग्रेस नेते लाखनी, यांचे स्वागत पालोरा येथील सरपंच सौ. अनिता गिऱ्हेपुंजे, यांनी केले. तसेच मंचकावर उपस्थित विशेष अतिथी,बालूभाऊ हजारे सौ.अनिता गिऱ्हेपुंजे ग्रा.प.सदस्य श्री.कैलास दिघोरे,देवनांद खोपे,सौ.ज्योती शहारे सौ.सुनीता मस्के,श्री, ताराचंद गिऱ्हेपुंजे, श्री,अंबादास धारगावे, ग्रामसेवक बनसोड मॅडम,तं. टा. मु.समितीचे अध्यक्ष श्री यशवंतजी धाबेकर,मा.उपसरपंच श्री ,दिलीप धारगावे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास  सुपारे ,व सर्व शाळा व्यवस्थापन समिकतीचे सदस्य गण तसेच सर्व पालक वर्ग आणि समस्त पालोरा ग्रामवासी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा तसेच शाळकरी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचार उत्साह वाढवला.