मनपा कंत्राटी अभियंता शुभम वरघट एसीबीच्या जाळ्यात
खाजगी इसमाचा तर्फे 1 लाख 30 हजारांची घेतली लाच
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगर पालिका मधील एका कंत्राटी अभियंत्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.शुभम वरघट(३५) असे या अभियंत्याचे नाव आहे.ही कारवाई स्थानिक लाच लुचपत विभागाने शनिवारी(दि२१)सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास केली.
प्राथमिक माहितीनुसार, इंजिनिअर शुभम यांनी कामाशी संबंधित फाईल मंजुरीसाठी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती.
विशेष म्हणजे, ही रक्कम थेट न स्वीकारता एका खासगी इसमामार्फत स्वीकारण्यात आली. ACB च्या पथकाने सापळा रचून १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
