धक्कादायक :चंद्रपूरात एकाच रात्री दोन भावंडांचा खून

ललित लांजेवार:


चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर येथे  दोन भावांची दगडाने व धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, सोनू साव- 28 आणि गुड्डू साव- 32 अशी मृतकांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटना स्थळी दाखल झाले.

 जुन्या वादातून आरोपीने मृतकांना धारदार शस्त्राने भर रस्त्यात ठार केल्याने परिसरात चांगलेच भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीवरून  या खून प्रकरणात तीन ते चार आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे वृत्त हे दोन्हीही मृतक गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचे सांगण्यात येत असून रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कोळी फरार आरोपीचा शोध घेत आहेत(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)