विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेत अवयवदान करा

जुन्नर /आनंद कांबळे:

जुन्नर तालुक्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेत अवयवदान करा ,याबाबत एक अंध व्यक्ती प्रचार व प्रबोधन करत आहे.

त्यांचे नाव श्री. विनायक विश्वनाथ नावरांगे, (यावली शहिद,) विदर्भ, संत तुकडोजी महाराज यांच्या भूमीतून आले आहेत विशेष म्हणजे ते एकटे आले आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षी कावीळ या रोगामुळे त्यांनी दृष्टी गेली, नंतर त्यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवन मध्ये पुढील शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी अंध लोकांची ब्रेल या शास्त्रज्ञाने विकसित केलेल्या ब्रेल लिपी, वेगवेगळे उपजीविकेसाठी लागणारे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.
साधना ताईंनी त्यांचा विवाह एका अनाथ मुलीशी लावून दिला, आत्ता त्यांना दोन मुले आहेत. पण आपल्या मध्ये काहीतरी कमी आहे म्हणून या व्यक्तीने दुसऱ्यांच्या आधाराची अपेक्षा न ठेवता जीवन जगायला सुरुवात केली. 
आज ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातील संस्था, शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन अवयव दानाचे महत्व पटवून देताना आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याच थोडक्यात माहिती द्वारे उद्बोधन करायचं काम चालू आहे. 
वयाच्या चाळीशीत सुद्धा हा माणूस लोकांना प्रेरणादायी ठरत आहे.ऐश्वर्या राय बच्चन यांच्या संस्थेने त्यांना एक लाख रुपयाची मदत करून हैद्राबाद येथे येत्या फेब्रुवारी मध्ये त्यांच्या एक डोळ्याचे रोपन होणार असण्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी आज जुन्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जुन्नर येथे त्यांचा एक छोटा उद्बोधनाचा कार्यक्रम घेतला. 
श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील प्रा.गौरव कांबळे यांनी याबाबत पुढाकार घेवुन कार्यक्रमाचे नियोजन केले.. डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी शाळेत कार्यक्रम घेण्यास पृरवानगी दिली.,आकाराम कवडे सर यांनी विशेष सहकार्य करून एक सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले. 
विनायक नावरांगे यांनी अवयव दान आणि आरोग्याविषयी माहिती दिली आणि संस्कार गीत गाऊन दाखवले. विशेष म्हणजे त्यांनी आवाहन केले की कुणाच्या घरी अपंग लोक असतील तर त्यांना मदत मिळवून देण्याचं प्रयत्न मी करेल. 
अशा अपंग लोकांना मदत करण्याचं काम आमदार बच्चू भाऊ कडू हे करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 
श्रीलंका मधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात डोळे भारतामध्ये आणले जातात अन कित्येक अंध लोकांना दृष्टी मिळते. 
यामागील करण एक की तिथल्या सरकार ने जनतेला अवयव दान करायला अनिवार्य केले आहे.

आपल्या भारतामध्ये लोक अजूनही अंधश्रद्धे मुळे अवयव दान करत नाही. मेल्यानंतर स्वर्ग कास पाहणार अश्या इत्यादी गैरसमज. याबाबत आपण सर्वांनी जनजागृती करायला हवी. मी सुद्धा अवयव दान करायचा निर्णय घेतला आहे आणि तुम्ही पण करावा अशी इच्छा बाळगून आहे.
तुमच्या आमच्या सारख्या डोळस असून अंध असलेल्या माणसांना या व्यक्तीने दृष्टी देण्याचा प्रयत्न अस म्हणता येईल.