पूर्वजांचे भाव ज्याच्या मनात आहे तो राष्ट्र हि संकल्पना समजू शकतो:अजयजी निलदावार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे “ भारत माता पुजन ” चा कार्यक्रम शहीद भगतसिंग चौक, पठाणपुरा रोड चंद्रपुर येथे संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हनून अजय निलदावार – प्रांत महामंत्री.वि.हि.प. नागपूर, कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपूर महानगरपालिका चे उपमहापौर श्री अनिल फुलझेले व कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी चंद्रपूर चे श्रीपाद जोशी, लेखक, नाटककार हे होते.

सर्व प्रथम चंद्रपूर महानगरपालिका चे उपमहापौर यांना चौकाचे सौन्दर्यीकरण करण्याचे व चौकातून विठ्ठल मंदिर कडे जाणाऱ्या मार्गाला “स्व.अॅड. दादाजी देशकर मार्ग” असे नाव देण्याबाबत निवेदन सदर कार्यक्रमातून देण्यात आले. व अनिल फुलेझेले यांनी सदर कार्यक्रमाबाबत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आपल्या भाषणात म्हणाले कि इतिहास चे स्मरण नेहमी करणे हि काळाची गरज आहे. आपल्या वैचारिक वारसा मध्ये नियमितता असणे आवश्यक आहे. संस्कृती माणसाला तेजस्वी बनवते. त्यागाची परंपरा हि सुरु असणे आवश्यक आहे. भगतसिंग यांचे साहित्य वाचण्याची गरज आहे. या वयात आपण इतक्या चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करणे म्हणजे आपली देशभक्ती हि जागृत असण्याचे प्रतिक आहे. इतिहासातून आपली संस्कृती कळते, संस्कृती मधून भाषा कळते म्हणून भाषा हि सुधृढ असणे आवश्यक असते. आपण या देशाचे देणे लागतो या विचाराने आपण जगले पाहिजे. असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पुढे म्हणाले की भारत माता पुजन हा कोणत्या धर्माचा कार्यक्रम नाही आहे हा समाजाचा उत्सव झाला पाहिजे. भारत मातेची सर्वानी पूजा केली केली पाहिजे.भारताचे रक्षण करणे हे कोणत्या एका संघठनेचे काम नाही आहे. हे सर्व धर्माचे काम आहे.कायद्याचे पालन म्हणजेच देशभक्ती आहे. जगात सहिष्णूता ही भारताकडून शिकली पाहिजे.रक्षण करणारी आपली संस्कृती आहे ति आपण सदैव जपली पाहिजे. व सदैव देशभक्ती जागृत ठेवली पाहिजे.व ति आपल्या आचरणातून दाखवली पाहिजे आज आचरनातून देशभक्ती दाखवण्याची अत्यंत गरज आहे. ज्या प्रकारे देशात वातावरण खराब होत चालले आहे ते पुढील काळासाठी योग्य नाही आहे. आज जे लोक भारतात रहातात तेच लोक भारताच्या विरोधात नारेबाजी करताना आपल्याला दिसून येतात. देशाच्या विरोधात नारे देणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. असे का होते या प्रश्नावर तरुण युवा पिढी ने विचार केला पाहिजे व देशाप्रती योग्य प्रेम व्यक्त केले पाहिजे.

आम्ही आमचा संस्कार टिकवून ठेवला तर आपली भारत माता मजबूत होणार. आपण आपल्या जीवन्मुल्याचे संरक्षण केले तर त्याचे संरक्षण समाजात होणार. पूर्वजांचे भाव ज्यांच्या मनात आहे ते राष्ट्र हि संकल्पना समजू शकेल.घरातील संस्कार जतन करणे आवश्यक आहे. व अशा देशभक्ती पर कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण चंद्रपूर शहरात चौका-चौकात करण्याचे आव्हान यावेळी उपस्थित नागरिकांना केले. व देश सेवा करणे म्हणजे सीमेवर जाऊनच करणे असे नव्हे तर सामाजिक क्षेत्रात राहून सुध्दा योग्य प्रकारे करू शकतो असे ते आपल्या भाषणात म्हणाले.


कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी भारत मातेचे पुजन केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शेवट वंदे मातरम नी कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमात वयक्तिक गीत चैतन्य खटी यांनी म्हंटले. प्रास्ताविक सुयश खटी यांनी केले व सूत्रसंचालन श्रेयश घरोटे , आभार प्रदर्शन प्रसाद घरोटे, वंदे मातरम तेजस्विनी घरोटे यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकुश पिंपळशेंडे, रवी म्हरसकोल्हे, आदित्य देशपांडे, शरद खनके, प्रसाद काटपाताळ, सुजित खटी, प्रज्वल काटपाताळ, चैतन्य खटी, ओंकार नेरलवार, मयूर घरोटे, कार्तिक भाकरे, ओंकार अंदनकर, विश्वनाथ तेलंग इत्यादीनी सहकार्य केले.