वर्ध्यात गळफास घेऊन आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

  सेलगाव(उमाटे) येथील रहिवासी सुरेश नत्थुजी गाखरे वय (४५वर्षे) यांनी आपल्याच शेताजवळील वनविभागाच्या जागेतील सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बकरी चारणाऱ्या गुराखी डोमा कुरमती हा तेथे गेला असता त्याला प्रेत झाडाला लटकले असल्याचे दिसले.त्यांनी लगेचच त्याने गावात जाऊन त्याच्या घरी जाऊन हा घटनेची माहिती दिली.तत्काळत्याच्या नातेवाईक मंडळी व आजूबाजूच्यांनी शेताकडे धाव घेतली. वासुदेव दत्तूजी गाखरे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून प्रेत हे ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे उत्तरीय तपासणी करिता आणले. उत्तरीय तपासणी झालेले प्रेत पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकाला दिले. मृतकाच्या मागे पत्नी आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी मृतकाचा मुलगा दुचाकी अपघातात मरण पावला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास केंद्रे व योगेश चाहेर आणि त्यांचा चमू करीत आहे.