जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे

विष्णु तळपाडे(अकोले/अहमदनगर):

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जि.प.मराठी शाळांचा दर्जा उंचावला गेला असून इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओंघ वाढत आहे.त्यामध्ये शिक्षकाचे मोलाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.सुनिता भांगरे यांनी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती अकोले(शिक्षिण विभाग)आयोजित बालआनंद मेळावा रणद बु.येथे उद्घाघाटन प्रसंगी केले.

कार्यक्रम अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे हे होते.व्यासपिठावर पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर ,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर,सरपंच अंजना कोरडे व ग्रामस्त ,शिक्षक व कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्यानी उपस्थित होते.

आधुनिक युगा सोबत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बद्दल घडतोय,जिल्हा परिषदेच्या गुणवत्तेमुळे मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे .यावेळी अशोक भांगरे म्हणाले आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत व्यवहारीक ज्ञानातही वाढ होते .आणि त्यांच्या कलागुणांना वावही मिळतो.सांस्कृतिक ,शैक्षणिक ,सामाजिक प्रगति घडुन बुद्धीला चालना मिळते .यावेळी रणद बु.च्या विद्यार्थ्यांनी मोठा बाजार भरविला होता.विक्रीसाठी रानभाज्या,वडापाव,इडली,आईस्क्रिम,भाजी-भाकरीचे स्टाँल उभारण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक,शिक्षक ,शाळाव्यवस्थापन समिती आणि जिल्हा. प.राजुर गट यांनी विशेष परिस्ञम घेतले .