स्वच्छतेत वाडी नंबर वन राहणार:प्रेम झाडे

नगर परीषदेचे एक पाहुल स्वच्छतेकडे
नागपूर/अरुण कराळे:

वाडीवासीयांचे सांघिक प्रयत्न, अठ्ठावीस नगरसेवकांची साथ आणि प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग यातुनच आम्ही येणाऱ्या काळात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहील्या क्रमांकावर राहू त्या दृष्टिने संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे हा सर्व कामाचा सपाटा पाहता वाडी स्वच्छता अभियानांत नबंरवन राहील असा विश्वास नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी व्यक्त केला .वाडी नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत परिसरात एक पाहूल स्वच्छतेकडे कार्यक्रम राबविण्यात येत आहे . त्यावेळी ते बोलत होते . प्रत्येक वार्डातील प्रत्येक रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी केले आहे.तसेच स्वच्छता अॅप मार्फत तक्रार दाखल करून परीसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले आहे.वाढत्या कचऱ्यांच्या ढीगाऱ्यामुळे होणारे अनेक त्रास परीसरात सहन करावे लागत होते . त्यामुळेच डेंग्यू,मलेरिया यासारखे घातक आजार वाढले होते . ही परिस्थिती पुन्हा होणार नाही याकडे नगरपरीषदचा आरोग्य विभाग कटाक्षाने लक्ष घालत असल्याची माहीती स्वच्छता व आरोग्य सभापती शालीनी रागीट यांनी सांगीतली .वाडी शहरातील बगीचे, रस्ते, नाल्या, गटर , शाळेतील परीसर स्वच्छ करण्याचे उत्कृष्ट कार्य नगर परीषद राबवित आहे.त्याचसोबत उघड्यावर शौच्छ करणाऱ्या व्यक्तिवर चालनची पावती देऊन दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आपण जेवणापूर्वी स्वच्छ हात धुतो कारण काय तर हातावर असलेले बॅक्टोरिया पोटात जावू नयेत म्हणून तद्वतच आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा वातावरणातील विषाणू आपल्या शरीरात जावू नये याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी ही काळजी फक्त स्वतःपुरता न ठेवता इतरांच्या संदर्भातही तेवढाच कळवळा ठेवायला हवा . म्हणूनच यापुढे स्वच्छता ठेवण्याची जीवनशैली सर्वांनी स्वीकारायला हवी . त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करुन वाडीचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी राजेश भगत यांनी केले आहे .