पुरोगामीच्या राज्यनेतेपदी विजय भोगेकर तर सरचिटणीस पदी हरीश ससनकर

कोल्हापूर येथील ७ व्या त्रैवार्षिक राज्य अधिवेशनात निवड
चंद्रपूर/प्रतिनिधी:

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे १३ जानेवारी रोजी पार पडले. यात संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील आर.जी.भानारकर यांची राज्य प्रमुख सल्लागार पदी, विजय भोगेकर यांची राज्य नेते पदी, हरीश ससनकर यांची राज्य सरचिटणीस पदी, तसेच महिला मंच राज्य अध्यक्ष पदी अल्का ठाकरे व सल्लागार पदी चंदा खांडरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच राज्याध्यक्ष पदी कोल्हापूर चे प्रसाद पाटील यांची फेरनिवड करण्यात आली, राज्य कार्याध्यक्ष पदी रत्नागिरी चे बळीराम मोरे यांची, कोषाध्यक्ष पदी नांदेड चे बालाजी पांडागळे यांची तर महिला मंच सरचिटणीस पदी कोल्हापूर च्या लक्ष्मी पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मा.मुख्यामंत्री महा.राज्य.यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांतजी भारतीय हे होते, स्वागताध्यक्ष पुणे म्हाडा चे अध्यक्ष समरजीतसिंह राजे घाटगे हे तर मा.महादेवराव जानकर मंत्री महा.राज्य., मा.आमदार गोविंदराव केंद्रे, मा.आमदार प्रकाश आबीटकर, जि.प.शिक्षण सभापती अंबरीशसिह घाटगे, शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी आशा उबाळे व अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मा.पंकाजाताई मुंडे मंत्री ग्रामविकास यांनी व मा.चंद्रकांतदादा पाटील मंत्री महसूल विभाग यांनी व्हिडीओ संदेश द्वारे शिक्षकांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनात विद्यार्थी व शिक्षक हिताच्या ३३ मागण्याचे ठराव मांडण्यात आले, यात उपस्थिती भत्ता ५ रुपये करण्यात यावा. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व सर्व शैक्षणिक साहित्य मोफत मिळावे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, वरिष्ठ श्रेणीचा २३ ऑक्टोबर चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा, ऑनलाईनची सर्व कामे काढून टाकावी, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, एम.एस.सी.आय.टी. मुदतवाढीचा शासननिर्णय तत्काळ पारित करावा या अन्य मागण्यांचा समावेश होता. मंचावर उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या मागण्या राज्यस्तरीय पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडे मांडून तात्काळ पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले. 

नवनियुक्त पदाधिकाऱ्याना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हानेते नारायण कांबळे, जिल्हाध्यक्ष दीपक वर्हेकर, सरचिटणीस रवी सोयाम, कोषाध्यक्ष निखील तांबोळी, कार्यालयीन सचिव लोमेश येलमुले, महिला मंच अध्यक्ष सुनिता इटनकर, कार्याध्यक्ष माधुरी निंबाळकर, सचिव विद्या खटी, कोषाध्यक्ष सुलक्षणा क्षीरसागर, उपाध्यक्ष दिलीप इटनकर, मोरेश्वर बोंडे, सुनील कोहपरे, किशोर आनंदवार, प्रमुख संघटक अनंता रासेकर, उपाध्यक्ष प्रभाकर भालतडक, ता.रा.दडमल, गजानन घुमे, हेमंत वाग्दरकर, रामेश्वर सेलोटे, अनिल नैताम, गजानन चिंचोलकर, अशोक दहेलकर, सुभाष अडवे, पी.टी.राठोड, अशोक मुसळे, अर्चना येरणे, नंदा मस्के, इंदिरा पहानपटे, माधुरी काळे, प्रभू देशेवार, मधुकर दडमल, राजू चौधरी, आकाश झाडे, गणेश चौहान, कल्पना महाकाळकर, चंदा धारणे, सरस्वती कोलते, आशा जोगी, मीना गादम, मालती सेमले, मीनाक्षी बावनकर, द्रोपदी दरेकर, मंगला कोमरेल्लीवार, लता मडावी, सिंधू राठोड, तालुका पदाधिकारी प्रतिभा उदापुरे, मनोज बेले, संजय चिडे, संदीप कोंडेकर, अभय बुटले, नरेश बोरीकर, सुधाकर कन्नाके, सतीश शिंगाडे, रणजीत तेल्कापल्लीवार, विक्रम ताळे, वाहिद शेख, विनोबा आत्राम, सुनील जाधव रोहिदास राठोड, जगदीश ठाकरे, बाळू गुंडमवार, गणपत विधाते, संदीप चौधरी, नरेंद्र मुंगले, गोविंद गोहणे, रामेश्वर मेश्राम, जीवन भोयर, राजेंद्र घोरुडे, निरंजन गजबे, विजय कुंभारे, पंकज तांबडे, पाकमोडे, कैलाश कोसरे, अतुल तिवाडे यांनी तसेच जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्य शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.