अन संडासच्या गडरमध्ये सापडल्या ७० पेटी देशी, १० पेटी विदेशी दारू



चंद्रपूर/प्रतिनिधी:

चोर कुठे काय लपवेल याचा काही नेम नाही,आणि पोलीस केव्हा कुठे यांचा गेम करेल याचा काही नेम नाही , चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी नंतर अवैध दारू विक्रेते व पोलिसात चोर पोलीस गेम सुरु झाला आहे,चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली या दारूबंदी नंतर अवैध दारू विक्रेते आपापली शक्कल लढवून अवैध दारूची तस्करी करू लागले, अशातच पोलिसांच्या नजरा दारू विक्रेत्यांकडे लागल्या हजारो कारवाया झाल्या तरी मात्र दररोज एक नवीन अवैध दारू विक्रेता उदयास येऊ लागला.

हि अवैध दारू लपवून आणण्यासाठी दारूविक्रेते तुफानी शक्कल लढवू लागले, कुणी चार चाकी गाडीच्या डिक्कीत,तर कुणी दरवाजाच्या फटीतून,तरी कुठे भाजीपाला टोपली,पेट्रोलच्या टंकित,गाडीत विशेष कप्प्याची सोय करून गाडीच्या आत,इंजनमध्ये अशा विविध प्रकारे दारू लपवून या मार्गाने विक्री करू लागले,मात्र शौचालयाला जाण्याचा गडरमध्ये देखील दारू लपविली जाऊ शकते याचा अंदाज फक्त चोरच घेऊ शकतो,अवैधरित्या आणलेली दारू संडासाच्या गडरमध्ये लपवून ठेवले मात्र पोलीस त्यांच्यापेक्षाही शहाणे निघाले आणि त्यातलाही सर्च ऑपरेशन मध्ये गडरमध्ये लपविलेली दारू पोलिसांनी बाहेर काढली.

हि घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चिनोर गावातील. बुधवारी पहाटे २ वाजता अवैधरित्या दारू तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली व त्यांनी तत्काळ पाठलाग सुरू केला अशातच शोधकार्य सुरू असताना गावातील Z.P शाळेच्या मागच्या बाजूला बांधकाम सुरु असलेल्या गडरमध्ये दारू सापडली, यात शौचालयाच्या खड्ड्यामधून ७० पेटी देशी व १० पेटी विदेशी दारू यासह २ दुचाकी असे एकून ९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शंकर मुटेकर, PC विनोद जाधव PC प्रफुल मेश्राम यांच्या पथकाने केली आहे.