प्रत्येक खेळाडूंनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी

वाडी पोलीस निरीक्षक नरेश पवार 
वाडीत जिल्हास्तरीय महिला-पुरुष कबड्डी स्पर्धा
वाडी(नागपूर) /अरुण कराळे: 

क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास त्याचा फायदा पुढे स्पर्धा परीक्षा,पोलीस विभाग,मिलिटरी,अशा प्रशासकीय सेवेत होतो,खेळात प्रामाणिक राहिल्यास आपले यश कोणीच हिरावू शकत नाही .खेळाडूनी विजयी झाल्यास त्याचा जास्त अतिरेकी विजय साजरा न करता पराभूत संघालाही तेवढ्याच आत्मयीतेने धीर दिला पाहिजे,पराभूत होऊनही आपल्या खिलाडूवृत्तीमुळे तो खेळ दीर्घकाळ समरणात राहतो,त्यासाठी प्रत्येक खेळाडुनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी असे मार्मिक मार्गदर्शन स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी केले.
दत्तवाडी येथील गजानन सोसायटी क्रीडा मैदानावर नगर परिषद वाडी नगराध्यक्ष चषक अंतर्गत नागपूर जिल्हास्तरीय महिला-पुरुष व वाडी विभाग शालेयस्तर आयोजीत कबड्डी स्पर्धेचे उदघाटन वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांचे हस्ते व नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच उपनगराध्यक्ष राजेश थोराने,मुख्याधिकारी राजेश भगत,क्रीडा व सांस्कृतिक सभापती मीरा परिहार,पाणी पुरवठा सभापती नीता कुनावार,महिला बालकल्याण सभापती कल्पना सगदेव,बसपा गटनेता अस्मिता मेश्राम यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी नगरसेवक केशव बांदरे,मंजुळा चौधरी,राकेश मिश्रा सामाजिक कार्यकर्ते सतीश जिंदल,मानसिंग ठाकूर, प्रणय मेश्राम ,दिलीप चौधरी,कमलेश बिडवाईक,ज्ञानेश्वर भोयर,अभय कुणावार,संजय जीवनकर,चंद्रशेखर निघोट, पीके मोहनन,जयप्रकाश मिश्रा,राजुताई भोले,ज्योती भोरकर, नंदा कदम,प्रमिला पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
तीन दिवशीय स्पर्धेत पुरुष संघाकरिता स्व . लालचंद गर्ग यांच्या स्मृती प्रित्यर्थ आकाश गर्ग तर्फे रोख २५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार,स्व .नारायणराव थोराने स्मृती प्रित्यर्थ शैलेश थोराने तर्फे रोख १५ हजार रुपयांचा द्वितीय रोख पुरस्कार,स्व .मातादिनलाल जैस्वाल स्मृती प्रित्यर्थ गौरव जैस्वाल तर्फे ७ हजार रुपयांचा तृत्तीय पुरस्कार तसेच महिला संघाकरिता स्व . पार्वती झाडे यांच्या स्मृत्ती प्रित्यर्थ प्रेम झाडे तर्फे रोख १५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार,स्व . मंजुळा बारई स्मृत्ती प्रित्यर्थ अनिल बारई तर्फे १० हजार रुपयांचा रोख पुरस्कार तर स्व .रंजन केचे स्मृती प्रित्यर्थ संतोष केचे तर्फे ५ हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे पंच म्हणून सचिन सूर्यवंशी,धनंजय चवळे,राजेश बालपांडे,अक्षय ठवकर,विजय मसराम,नितीन खरे,राजू विश्वकर्मा हे जबाबदारी सांभाळत आहे.जिल्ह्यातील २६ संघांनी आजपर्यंत नोंदणी केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेश भगत,संचालन उपमुख्याधिकारी आकाश सहारे,तर आभार प्रदर्शन संदीप अढाऊ यांनी केले.