नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन

ऊर्जामंत्र्यांचे हस्ते उद्घाटन
वीज क्षेत्र वाटचाल व आव्हाने यावर मार्गदर्शन
नागपूर/प्रतिनिधी:

महावितरण,महानिर्मिती,महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी अश्या अतांत्रिक अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न/समस्या सोडविण्याकरीता म.रा.वि.मं.अधिकारी संघटना नेहमीच पुढाकार घेत असते. यंदा संघटनेच्या ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे यजमानपद नागपूर परिमंडळाकडे आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेच्या ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) योगेश गडकरी, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) महापारेषण सुगत गमरे, प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर दिलीप घुगल, मुख्य महाव्यवस्थापक सूत्रधारी कंपनी संदेश हाके, मुख्य महाव्यवस्थापक महावितरण स्वाती व्यवहारे, मुख्य अभियंता कोराडी वीज केंद्र अभय हरणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 


राज्यभरातील सुमारे ४०० वीज अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे आयोजन आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे. 

वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा होणार आहे. शनिवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा तर दुपारच्या सत्रात वीज कंपन्या व संघटनेची भविष्यकालीन वाटचाल व आव्हाने यावर मान्यवर अतिथी मार्गदर्शन करणार आहेत. रविवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पत संस्थेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. 

म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, सरचिटणीस दिलीप शिंदे, संघटन सचिव प्रवीण बागुल यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी नागपूर परिमंडळाचे अध्यक्ष प्रवीण काटोले, सचिव राजेश कुंभरे तसेच शरद दाहेदार, सौ.सविता झरारीया, सौ.तृप्ती मुधोळकर, प्रमोद खुळे,नंदकिशोर पांडे,वैभव थोरात, निलेश जुमळे, राधेश्याम उईके, नागपूर परिमंडळातील संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.