नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सप्तरंग क्रीडा मंडळ अव्वल



महीला गटात नेहरू क्रीडा मंडळ अव्वल 
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे

वाडी नगर परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक स्पर्धा अंतर्गत नागपूर जिल्हास्तरीय पुरुष गटातील कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नागपूरातील नदंनवन मधील सप्तरंग क्रीडा मंडळाने अव्वल स्थान पटकावले . 

त्यांनी नागपूरातील सक्करदरामधील जयहिंद क्रीडा मंडळावर मात करून स्व . लालचंद गर्ग यांच्या स्मृती प्रित्यर्थ आकाश गर्ग यांच्या तर्फे रोख २५ हजार रूपयांचा प्रथम पुरस्कार व नगराध्यक्ष चषक पटकावला . उपविजेत्या संघाला स्व . नारायणराव थोराने स्मृती प्रित्यर्थ शैलेश थोराने यांच्या तर्फे रोख १५ हजार रुपयांचा द्वित्तीय पुरस्कार व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . तृतीय पुरस्कार सुभाष क्रीडा मंडळ नागपूर व जय बजरंग क्रिडा मंडळ सोनेगाव (निपाणी ) यांना स्व .मातादिनलाल जैस्वाल स्मृती प्रित्यर्थ गौरव जैस्वाल यांच्या तर्फे रोख ७ हजार रुपये व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . महीला गटात नेहरू क्रीडा मंडळ सक्करदरा नागपूरच्या निरामय क्रीडा मंडळावर मात करुन स्व .पार्वती झाडे यांच्या स्मृत्ती प्रित्यर्थ प्रेम झाडे यांच्या तर्फे रोख १५ हजार रूपयांचा प्रथम पुरस्कार व नगराध्यक्ष चषक पटाकाविला उपविजेत्या संघाला स्व . मंजुळा बारई स्मृत्ती प्रित्यर्थ अनिल बारई यांच्या तर्फे रोख १० हजार रूपयांचा द्वितीय पुरस्कार व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . 

तृतीय पुरस्कार त्रीरत्न क्रीडा मंडळ कामठी संघाला स्व .रंजन केचे स्मृती प्रित्यर्थ संतोष केचे यांच्या तर्फे रोख ५ हजार रूपयांचा पुरस्कार व नगराध्यक्ष चषक देण्यात आला . वाडी विभाग शालेयस्तरावरील वर्ग ४ ते ७ विद्यार्थी गट प्रथम क्रमांक जिंदल पब्लीक स्कूल वाडी , द्वितीय क्रमांक जि.प. उच्च प्राथमिक शाळा वाडी .विद्यार्थीनी गट प्रथम क्रमांक प्रबोधनकार ठाकरे स्मृती माध्यमिक विद्यालय वाडी , द्वितीय क्रमांक जिंदल पब्लीक स्कूल वाडी . वर्ग ८ ते १० विद्यार्थी गट जिंदल पब्लिक स्कूल वाडी , द्वितीय क्रमांक केंद्रीय विद्यालय डिफेन्स .विद्यार्थीनी गट लिटील स्टार कॉन्व्हेंट वाडी . द्वितीय क्रमांक प्रबोधनकार ठाकरे स्मृती माध्यमिक विद्यालय वाडी . वर्ग ११ वी १२ प्रथम क्रमांक केंद्रीय विद्यालय डिफेन्स .

 द्वितीय क्रमांक जवाहरलाल नेहरू विद्यालय व महाविद्यालय वाडी यांनी प्राप्त केला .बक्षीस वितरण समारभांत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ . राजीव पोतदार , आ .गीरीश व्यास , आ . समीर मेघे, नगराध्यक्ष प्रेम झाडे ,उपनगराध्यक्ष राजेश थोराने, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक नरेश चरडे , मुख्याधिकारी राजेश भगत ,सभापती नीता कुनावार , सभापती मीरा परिहार,सभापती कल्पना सगदेव, सभापती शालिनी रागीट , उपसभापती आशा कडू , नगरसेवक राजेश जयस्वाल , नरेंद्र मेंढे,केशव बांदरे , अभय कुणावार, संतोष केचे ,दिनेश कोचे , सरीता यादव , अस्मिता मेश्राम ,मंजुळा चौधरी,प्रज्ञा झाडे,राकेश मिश्रा ,सतीश जिंदल, पुरुषोत्तम रागीट ,मानसिंग ठाकूर, अखील पोहनकर , रूपेश झाडे , ज्ञानेश्वर भोयर,अभय कुणावार,संजय जीवनकर , जनकताई भोले,ज्योती भोरकर, आंनदबाबू कदम, आशीष पाटील , शऋघ्नसिंह परिहार, रुपेश झाडे , राजकुमार बोरकर , दुर्योधन ढोणे , प्रकाश कोकाटे , अश्विन बैस, राजेंद्र चौधरी , अॅड . श्रीराम बाटवे प्रामुख्याने उपस्थित होते. 

स्पर्धेचे पंच म्हणून सचिन सूर्यवंशी,धनंजय चवळे,राजेश बालपांडे,अक्षय ठवकर,विजय- मसराम,नितीन खरे,राजू विश्वकर्मा यांनी जबाबदारी सांभाळली त्यांचाही सत्कार करण्यात आला .
प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेश भगत,संचालन उपमुख्याधिकारी आकाश सहारे, आभारप्रदर्शन नगरसेवक केशव बांदरे यांनी केले.आयोजनासाठी जय क्रीडा मंडळ सोनेगाव व वाडी नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .










2 Attachments





















ReplyForward