चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रामाळा तलाव स्वच्छता व प्लास्टिकसंबंधी जनजागृती मोहीम




चंदपूर ३० एप्रिल - रामाळा तलाव स्वच्छता व प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी रविवार २८ एप्रिल रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे रामाळा तलावसौंदर्यीकरण मार्गावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात व जी एम फेलो पूजा द्विवेदी यांच्या प्रयत्नांनी पथनाट्य, फ्लॅश मॉब( नृत्य ), स्टॅन्ड अप कॉमेडी या विविध कार्यक्रमांद्वारे पर्यावरणाच्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदी व रामाला तलावाच्या स्वच्छतेसंबंधी अभिनव मार्गाद्वारे जनजागृती सातत्याने केली जात आहे. सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीनइतिहास असलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाची स्वच्छता व सौदर्यीकरणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तलावातील पाणी प्रदुषित होण्याला मच्छीनाला व शहराच्या उत्त्तरेकडून वाहणारे नाल्यातील सांडपाणी कारणीभूत आहे. रामाळा तलाव स्वच्छ करणे व ते पाणी नेहमीकरीता कसे साफ राहील याची उपाययोजना करणे याकरीता मनपाद्वारे विविध उपाययोजनांवर काम केले जात आहे याकरीता नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असल्याने अभिनव जनजागृतीमोहीम राबविली जात आहे.

२३ जून, २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती, प्लास्टिक पिशव्यांचा अतिवापर हा स्वच्छता, प्रदूषणासह अनेक नागरी समस्यांच्या दृष्टीने आव्हान ठरले आहे. .सार्वजनीक जीवनात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेला प्लास्टिकचा वापर बंद करण्यास महानगरपालिका प्रयत्नरत आहे. आजघडीला बहुतेक घरी, व्यापारी केंद्रांवर, प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास व अन्य वस्तूंचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येतो. नागरिकांना आपल्या घरातील प्लास्टिकची विल्हेवाटलावता यावी याकरीता विविध पर्याय मनपाद्वारे याआधी दिले गेले आहेत.

आपल्या रामाला तलावासंबंधी नागरिकांचे प्रेम जागृत व्हावे व कुठल्याही स्वरूपाचा कचरा विशेषतः प्लास्टिक व थर्माकोल कुणीही तलावात टाकू नये याकरीता विविध सामाजिक संघटनांनी पथनाट्य, फ्लॅश मॉब ( नृत्य ), स्टॅन्ड अप कॉमेडी या अभिनव मार्गाद्वारे जनजागृती मनपाद्वारे केली गेली. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. प्लास्टिकचा अतिरेकी वापर, त्यांचे संभाव्य धोके, प्लास्टिक पिशवीचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम, त्यावर उपायांबाबत विविध स्तरावर पालिकेतर्फे यापूर्वीही मोठ्या प्रमाणावरजनजागृती केली गेली आहे.

कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनां वाल्मिकी मछूआ सहकारी संघटना, एम एच ३४ डान्स ऍकेडमी, अभिनयसूत्रम ऍक्टिंग क्लासेस, स्व. उद्धवराव बोबडे बहुद्देशीय संस्था, इको प्रो यांनी सक्रिय सहभाग घेतला. सुरेश चोपणे, डॉ. पालीवाल, जयश्री कापसे , मनोहरलाल व्यास यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन श्याम हेडाऊ यांनी केले. या प्रसंगीसहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत, आरोही फाऊंडेशन व ए एस पी एमच्या साक्षी कार्लेकर, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितहोते