चंद्रपूर -
पोलीस स्टेषन तळोधी येथे फिर्यादी नामे निकेष वसंता खोब्रागडे, रा. काळजसर चिमुर यांनी तक्रार दिली की, ते आपल्या नातेवाईकाकडे नांदेळ, तळोधी येथे गेले असता रात्रो दरम्यान त्यांची दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर प्लस एम.एच. ३१ बी.एक्स ७५४ ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली. अषा रिपोर्टवरून पोलीस स्टेषन तळोधी येथे अप.क्र. १०२/२०१९ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा नोंद होताच पोलीसांनी तपासादरम्यान वेगवेगळे तर्क लावुन दुचाकीचा षोध घेण्यास सुरूवात केली. आजुबाजुच्या परिसरातील लोकांना विचारपुस करण्यात आली. दिनांक १२/०५/२०१९ रोजी तपासदरम्यान पोलीसांना गोपनीय सुत्राकडुन माहिती मिळाली की, एक इसम आपल्या ताब्यात एक संषयीत दुचाकी वाहन घेवुन फिरत आहे. अषा माहितीवरून सदर इसमास ताब्यात घेवुन त्यांची चौकषी केली असता, त्याचे ताब्यात चोरीस गेलेली हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस एम.एच. ३१ बी.एक्स ७५४ मिळुन आली. सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकषी केली असता, त्याच्या माहिती समोर आली की, त्यांनी याआधी सुध्दा दुचाकी वाहन चोरी केले आहे आणि ते आपल्या घरी लपवुन ठेवलेले आहे. यावरून पोलीसांनी सदर आरोपी नामे राजु बालाजी धुर्वे वय २५ रा. धामनगाव चक याचे घराची झडती घेतली असता त्याचे जवळ खालीलप्रमाणे मोटारसायकली मिळुन आल्या.
सदरचा गुन्हा हा २४ तासाच्या आतच उघडकिस आला असुन आरोपी कडुन एकुण ०५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आले आहे. पुढिल तपास तळोधी पोलीस करीत आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. महेष्वर रेडड्ी यांचे मार्गदर्षनात, उपपिवभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री. प्रषांत परदेषी यांचे नेतृत्वात पोलीस स्टेषन तळोधी प्रभारी सपोनि. श्री. षिरसाठ यांचे सह तळोधी येथील पोलीस पथकाने पार पाडली.