चंद्रपुर लोकसभा निवडणुकीत सुरेश धानोरकर विजयी

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत सुरेश धानोरकर विजयी धानोरकर यांना 5 लाख 59 हजार 507 मते मिळाली 44 हजार 763 मताधिक्यांनी सुरेश धानोरकर विजयी   चंद्रपूर ,दि. 24 :- चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मे 2019 रोजी वखार महामंडळ गोडाऊन येथे झाली. या  निवडणुकीत इंडीयन नॅशनल कॉग्रेसचे उमेदवार बाळूभाऊ उपाख्य सुरेश धानोरकर यांना 5 लाख 59 हजार 507 मते मिळाले तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हंसराज अहिर यांना 5 लाख 14 हजार 744 मते मिळाली.  एकूण 44 हजार 763 मताधिक्यांनी सुरेश धानोरकर विजयी झाले. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांचेसमवेत निवडणूक निरिक्षक दिपांकन सिंन्हा आदी उपस्थित होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान घेण्यात आले होते. एकूण मतदारांची संख्या 19 लाख 4 हजार 32 होती.  त्यापैकी 12 लाख 31 हजार 147 एवढे मतदान झाले असून त्याची टक्केवारी  64.66  आहे.  या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार रिंगणात होते, त्यांना पोस्टल बॅलेटसह झालेले मतदान पुढील प्रामाणे आहे. बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक यांना 11810, बहुजन मुक्ती पार्टीचे गौतम नगराळे यांना 2450, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ मडावी यांना 3103, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव शेडमाके यांना 3017, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे नितेश डोंगरे यांना 4701, प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांना 1589, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. राजेंद्र महाडोळे यांना 112079 मते तर अपक्ष उमेदवार अरविंद राऊत यांना 1473, नामदेव