पालकमंत्र्यांच्या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पनेला केळझर ग्रामपंचायत करून ठेंगा!








                    पालकमंत्र्यांच्या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पनेला केळझर ग्रामपंचायत करून ठेंगा!

 चंद्रपूर, महाराष्ट्र शासनाने दरवर्षी वृक्ष  लागवड करण्याचा  एक संकल्प  साकारला, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार त्यांनी राज्यात 50 कोटी लागवड करण्याचा  निर्धार केला आहे. त्यात आता ३५ कोटीच्या वृक्ष लागवडीचा  मोहिमेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते स्वर्गीय बाबा आमटे यांच्या  कर्मभूमीतुंन शुभारंभ केला आहे.  ज्या मंत्र्यांनी वृक्षारोपणाचा  विडा उचलला आहे.  त्याच मंत्र्याच्या  विधान परिषद  क्षेत्रातील  मूल तालुक्यातील केळझर ग्रामपंचायतीने वृक्षरोपणाला गालबोट लावले आहे.  हजारो झाडे लावण्या आधीच जनावरांनी फस्त केली आहे.
 वृक्षाची दरवर्षी होत असलेली -हास यामुळे दिवसे गणी जागतिक तापमानात वाढ होत आहे.  अवेळी येणारा पाऊस यामुळे नैसर्गिक वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.  त्यामुळे तीन वर्षात 50 कोटी वृक्ष रोपण करण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचे पालकमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे.  त्याची नोंद ग्रिनीच बुक ऑफ वर्ड   रेकॉर्ड मध्ये झालेले आहे.  यावर्षीच्या एक जुलै पासून वृक्षारोपण लागवडीचा शुभारंभ करण्यात आला आहे.  त्याची सुरुवात जिल्ह्यातील विविध भागातून वृक्षदिंडी काढून केला जात आहे.   मात्र  केळझर ग्रामपंचायत येथील   सरपंच व ग्रामसेवकाच्या निष्काळजीपणामुळे हजारो   रोपटे बेवारस टाकल्यामुळे जनावरांनी खाऊन नष्ट केली. या हजारो झाडांची झालेली नुसकान भरपाई, तसेच यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे त्यावर योग्य ती कारवाई  व्हावी, एक जुलै 2019 रोजी केळझर ग्रामपंचायतीला 3400 वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आले, त्यानुसार त्यांनी पहिल्या टप्प्यात 1300वृक्ष खरेदी केले. त्यातील 300 झाडे इतरस्त्र लावण्यात आले. आणि एक हजार झाडे मात्र गावातील बाहेर असलेल्या  पांदन रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले. विस्कटलेल्या   रोपट्यांना गाई-ढोरानी  खाऊन फस्त केले.  मात्र या खाल्लेल्या रोपट्यांनची ग्रामसेवकाला काही सोयरसुतक नसल्याचे प्रत्यक्ष दर्शन दिसून आले.  उलट जनावरांनी खाल्लेले झाड काय करू शकतो. अशा प्रकारची उलट भाषा बोलून  आतापर्यंत  लावलेले तेरा कोटी झाडेत्यांनी कुठे जगवली , अशा प्रकारची उलट भाषा   एका ग्रामपंचायत सदस्यांनी करून पालकमंत्र्यांच्या संकल्पनेला खिळ  लावण्याचा प्रयत्न केला. उलट माध्यमांना  काय करायचे आहे, ते करा ,  तो आमच्या गावचा प्रश्न आहे, आम्हाला जे करायचे आहे ते करू? असा उर्मटपणे उत्तर देऊन वृक्ष लागवडीला एक प्रकारचा नकार असल्याचा स्पष्टपणे जाणवले.  यासंदर्भात जिल्हा परिषद चे अध्यक्ष  देवराव भोंगळे यांना भ्रमणध्वनीवरून या संदर्भातली माहिती दिली असता.  वृक्ष नष्ट केली असेल तर दोषीवर नक्कीच कारवाई करू असे म्हटले.  यापूर्वी केळझर ग्रामपंचायतीने लागवडीकरता लावलेलीवृक्ष व्यर्थ गेली. लाखो रुपयांचा खर्च कागदोपत्रीच  दाखवून वृक्ष लावल्याचे सोंग केल्याचे यावरून निदर्शनास येते.  लावलेल्या झाडांचे संगोपन न करता पंचायत समिती स्तरावरून त्याचे निघालेले बिल व संबंधित व वन विभागाकडून खरेदी केलेल्या वृक्षाची माहिती घेऊन ग्रामपंचायत सचिवासह निष्काळजी करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी.