ग्रामसेवकांचे विविध मागण्यासंदर्भात एक दिवसीय असहकार आंदोलन!







ग्रामसेवकांचे विविध मागण्यासंदर्भात एक दिवसीय  असहकार आंदोलन!
 चंद्रपूर. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन  तालुकाशाखा चंद्रपुर यांनी एक दिवसीय असहकार आंदोलन दिनांक नऊ ऑगस्ट 2019 ला पंचायत समिती चंद्रपूर येथे घेऊन राज्य शासनाने जाचक अटी लावून  कर्मचार्‍यांना वेठीस धरण्याचे काम सरकार कडून होत आहे. ग्रामसेवकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी सरकारचे लक्ष वेधावे या  प्रलंबित मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत अधिकारी पद निर्मित करावे.  ग्रामसेवक संवर्गास  प्रवास  भत्ता  शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावे.  ग्रामसेवक शैक्षणिक  अहर्ता बदल करून पदवीधर ग्रामसेवक नेमणुका करावे.  ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करून  सण 2015 नंतरचे   ग्रामसेवक याची  जुनी पेन्शन लागू करण्यात यावे. आदर्श ग्रामसेवक राज्य/ जिल्हास्तर आगाऊ वेतन वाढ करून एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करणे ग्रामसेवका कडीला अतिरिक्त कामे कमी करावे .ह्या मागण्या घेऊन पुढील असहकार आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यात करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.यासह असहकार आंदोलनात चंद्रपूर पंचायत समिती तालुका ग्राम सेवक संघटनेचे ग्रामसेवक  चात्रेश्वर,   ग्राम. वि. अ. लांबट, नगराळे, धकाते, विरुटकर,  चांभार,  येवले,  वासाडे,  नागदेवते,  केंद्रे, ग्रामसेवक  वेस्कडे,बागडे,  चव्हाण, चौधरी, खोब्रागडे, विकास बोरवार,  एस एम नंदेश्वर,  वर्षा ढाले, हर्षदा बागडे,  मेश्राम,  धुर्वे,   एन एच डवरे,   देवगडे,  वर्षा मानकर,  व्ही एन केवे,  निमसरकर,   सोनाली टापरे,  पिदुरकर,  माथनकर, गोडे,  डीबी इंदुरकर यांनी या असहकार आंदोलनात सहभागी झाले होते.