अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलन! नाभिक समाजाच्या विविध पैलूवर संमेलनाध्यक्षचे मार्गदर्शन! संमेलनात नव ठराव मंजूर!


अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक साहित्य
                         संमेलन!
नाभिक समाजाच्या विविध पैलूवर संमेलनाध्यक्षचे मार्गदर्शन! 
संमेलनात नव ठराव मंजूर! 
चंद्रपूर : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ,  महाराष्ट्र आयोजित अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलन दिनांक 9/11 / 2019 ला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत  कै.  स्थळ राम नगरकर साहित्यनगरी हॉल टाऊन नेहरू मैदान अमरावती येथे संपन्न झाले. . यानिमित्ताने समाजामध्ये दडलेली प्रतिभा  सर्वांसमोर आणण्यासाठी एक दिवसीय नाभिक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. या आनंदाच्या क्षणी  आपण या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नाभिक समाज साक्षीदार झाले. .  या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय गोपाल कृष्णाची मांडवकर,  ज्येष्ठलेखक, साहित्यिक, तथा ज्येष्ठ उपसंपादक दैनिक लोकमत नागपूर, मानुसकिचा धागा जपणारे ,तसेच सुधीरजी राऊत महा. राज्य केश शिल्पी महामंडळाचे अध्यक्ष, तसेच स्वागताध्यक्ष माननीय शरदरावजी ढोबळे ज्येष्ठ साहित्यिक यवतमाळ, सहस्वागताध्यक्ष  माननीय प्रकाशजी नागपुरकर ज्येष्ठज्येष्ठ ना.  समाज सुधारक साहित्य अभ्यासक  अमरावती,  प्रमुख अतिथी उत्तमरावजी बिडवे ज्येष्ठ साहित्यिक,  बुलढाणा, संपादक संजय येऊलकर दैनिक एकमत, निवृत्ती पिस्तुलकर, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक माननीय शिवलिंगजी  काटेकर ज्येष्ठ साहित्यिक व वराडी कवी,प्रा. कल्पना निंभोरकर प्रा. सौ. अश्विनी अतकरे, प्रमोद गंगात्रे, गोपाल कडुकर, राजेंद्र अमुतकर, यांची उपस्थिती होती .  
 अमरावतीत पहिले साहित्य संमेलन  घेण्यात आले.  कदाचित हे संमेलन नाभिक समाजाचे ज्ञानाचा दिप तयार करणारे! ठरणार. या संमेलनाचे अनेक संकेत वेगवेगळ्या समाजात जातील. हे संमेलन  क्रांतीकारी होणार आहे. म्हणून इतरां पेक्षा कमी समजू नका! हा समाजच मोठा आहे. आपला समाजच हा सल्लागार, बातमीदार आहे. या व्यासपीठावर बसल्यावर मला माझ्या स्वतःच्या आई जवळ बसल्याचा आंनद होत आहे. इथे हजरोची संख्या नाही पण येथे विचा-याची संख्या आहे. आणि तिच समाजासाठी महत्वाची आहे. सुधीर राऊत म्हणाले  येथे ज्या खुर्च्या भरल्या आहेत त्या विचा-याचा मानसानी भरल्या आहेत . माझा राजकिय पेशा असला तरी मि या समाजाचा एक घटक आहे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीनी आपल्या समाजातील एका मुलीला ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात यावे. मि नेहमी रामकृष्ण बेलुरकर महाराजांचे साहित्य ऐकायला जात होतो. आतापर्यंत 
साहित्याने जो समाज घडला तो समाज मोठा झाला.  राऊत यांनी संबोधित केले.
नाभिक समाजाने आपले स्वतःचे साहित्य संमेलन घ्यावे, ही घटनाच मुळी साहीत्य विश्वासाला अचंबित करणारी आहे. साहित्य पोट भरल्यावर जन्माला येते. हा प्रवाद अमान्य आहे. असे असते. तर संत सेनाजी महाराज, संत नगाजी महाराज यांची प्रतिभा फुलली नसती., गरिबी आणि अवहेलनाचे चटके सोसणारे राम नगरकर महाराष्ट्राचे लाडके झाले नसते. 
वेदनांचे   डंक बसलेली व समाजहिताचे भान राखनारी प्रतिभा साहित्यात सत्व अन् स्वत्व उतरविते. या संमेलनाच्या माध्यमातून साहित्याच्या लेखणीतून हेच उतरावे. त्यातून सामाजिक ममत्वाचा निर्झर अखंड प्रवाहीत होत राहावा. हि साहित्य चळवळ समाजाला नक्कीच एक दिशा देणारी ठरेल. समाजाला आजवर कधी अनुभवली नाही अशी  संक्रमणावस्था आपण अनुभवतोय आहे. यातून स्वता:च्या हक्काचे व्यासपीठ समाजात निर्माण झाले. हि  ज्योत अखंड दिव्यासारखी तुम्हा, आम्हाला चेतवायची आहे.  या संमेलनात  नव ठराव पारित करण्यात आले. कवी संमेलन, कथा, काव्यसंग्रहाचे   प्रकाशनही करण्यात आले. हे साहित्य संमेलन नाभिक समाजासाठी दिशा देणारे ठरले असे मनोगत साहित्यकारानी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रवीण बोपुलकर,  वैष्णवी अतकरे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल कन्नेकर यांनी केले ,  आभार प्रदर्शन व  शेवटी   राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.